तरुण भारत

गणेश मूर्तीच्या अंगावरील 68 हजाराचे चांदीचे दागिने लंपास

छ. राजाराम चौक, टिंबर मार्केट येथील घटना

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

छ राजाराम चौक, टिंबर मार्केट येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपातील गणेशमूर्तीच्या अंगावरील चांदीचे 68 हजार रुपये पेंमतींचे दागिने अज्ञात चोरटÎाने लंपास केले. मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज राजेंद्र नरके (वय 29 रा. राजाराम चौक )यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, राजाराम चौकात छत्रपती राजाराम चौक मित्र मंडळ आहे. गेल्या 40 वर्षापासून या मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाही मंडळाच्या वतीने मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

मंडपात रात्री मंडळाचे कार्यकर्ते झोपायला असतात. बुधवारी पहाटेच्या सुमारास मूर्तीच्या हातातील 59, 220 रुपये किंमतीचे चांदीचे कंड, 9 हजार 400 रुपये किंमतीच्या चांदीच्या चार अंगठÎा गायब असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. कार्यकर्त्यांनी मंडळाच्या सर्व सदस्यांकडे चौकशी केली. पण दागिने मिळाले नाहीत. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. मात्र त्यामध्येही संशयास्पद कोणी आढळले नाही. यामुळे सायंकाळी पृथ्वीराज नरके यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस नाईक चोडणकर तपास करत आहेत.

Related Stories

बहिरेश्वरच्या सरपंचपदी युवराज दिंडे यांची बिनविरोध निवड

triratna

कोरोना कालावधीतील वीज देयक हप्त्यात भरण्याची सवलत

triratna

जिल्ह्यात शेतकरी संपर्क मोहिमेचे स्वागत

triratna

कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने आजपासून `अनलॉक’

triratna

शिरोळ व हातकणंगलेतील साखर कारखाना टोळ्या न आल्याने गळीत हंगामावर परिणाम

triratna

रिक्षा मीटर फेरफार करणाऱ्या व्यावसायिकांना योग्य सूचना द्या

triratna
error: Content is protected !!