तरुण भारत

सिगारेट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणाऱ्या तरुणास अटक

प्रतिनिधी / कोल्हापूर


सिगारेट देण्याच्या बहाण्याने इचलकरंजी येथील प्रवाशास लुटणाऱया शिंगणापूर येथील तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. आकाश चंद्रकांत मुळे ( वय 30 रा. गणेश कॉलनी, शिंगणापूर ) असे संशयिताचे नाव आहे. 6 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती.
r, इचलकरंजी येथील निखील कुलकर्णी कामानिमीत्त 6 सप्टेंबर रोजी सकाळी कोल्हापूरात आले होते. काम आटोपून ते रात्री 10 वाजण्याच्या सुमारास इचलकरंजीला घरी परतत होते. चहा घेण्यासाठी ते मध्यवर्ती बस स्थानक परिसरात थांबले असता, दोघे तरुण मोपेडवरुन त्यांच्या जवळ आले. कुलकर्णी यांनी त्यांना येथे सिगारेट कोठे मिळते अशी विचारण केली. त्या दोघांनी निखीलला मोपेडवर बसविले. यानंतर थेट त्यांना पंचगंगा घाट येथे नेले व मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करुन त्यांच्याकडील 1 तोळ्याच्या दोन अंगठÎा, 1 मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. निखील यांना पंचगंगा घाटावर सोडून त्यांनी पलायन केले होते. याप्रकरणी कुलकर्णी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या गुन्हÎाचा तपास करुन संशयित आकाश मुळे याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील मुद्देमाल व दुचाकी हस्तगत केली आहे. त्याच्या दुसऱया साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, आसिफ कलायगार, विनोद कांबळ, रणजित पाटील,सायबर सेलचे सुरेश राठोड, संदीप गुरव, अमर वासुदेव यांनी ही कारवाई केली.

Advertisements

Related Stories

वारणानगर येथील इंग्लीश अकॅडमीत ६५ हजाराची चोरी

triratna

टाेप मधील आणखी एका महिलेला कोरोनाची लागण

triratna

कोल्हापूर : महे-कसबा बीड पुलाजवळील अपघातात युवक जागीच ठार

triratna

कोल्हापूर : पत्रकार हा समाजातील घडामोडींचे वास्तव मांडणारा योध्दा : चंद्रकांत दंडवते

triratna

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर

triratna

अखेर एमपीएससीची माघार !

triratna
error: Content is protected !!