तरुण भारत

गुजरातमध्ये आज २७ मंत्री घेणार शपथ

भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळात सर्व नवीन चेहऱयांना संधी

गांधीनगर / वृत्तसंस्था

Advertisements

गुजरातमधील भूपेंद्र पटेल सरकारमधील नवे मंत्री गुरुवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. भूपेंद्र पटेल सरकारमध्ये एकूण 27 मंत्री शपथ घेणार असून सर्व नवीन चेहरे मंत्रिमंडळात सहभागी होतील अशी चर्चा आहे. मात्र, नवीन मंत्र्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. विस्तारित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा राजधानी गांधीनगरमध्ये दुपारी 1.30 वाजता होणार आहे.

भूप्रेंद पटेल यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ बुधवारी होणार असल्याचे यापूर्वी भाजपने जाहीर केले होते. शपथविधी सोहळय़ासाठी राजभवनावरील पोस्टर्समध्ये 15 सप्टेंबरची तारीखही लिहिण्यात आली होती. मात्र, बुधवारी दुपारी ही पोस्टर्स काढण्यात आली. नव्या मंत्र्यांच्या निवडीवरून गटबाजी सुरू झाल्यानंतर शपथविधी सोहळा गुरुवारपर्यंत पुढे ढकलण्यात आला. मंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी दुपारी 1.30 वाजता होणार असल्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे विशेष कर्तव्य अधिकारी मनीष भारद्वाज यांनी सांगितले. मात्र, भाजप किंवा राज्य सरकारने शपथविधी सोहळा पुढे ढकलण्याचे कोणतेही कारण दिले नाही. तत्पूर्वी बुधवारी दुपारी 2 नंतर गांधीनगरमध्ये शपथविधी सोहळा होणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे गुजरातचे प्रवक्ते यमल व्यास यांनी जाहीर केले होते.

मंत्रिमंडळ निवडीवरून जोरदार रस्सीखेच

गुजरात भाजपात सध्या अस्थिर वातावरण असून मंत्रिमंडळ निवडीवरून मोठा वाद सुरु झाल्याचे दिसून येत आहे. जातीय समीकरण आणि स्वच्छ चेहऱयाला मंत्रिमंडळात स्थान देण्याची भाजपाने रणनिती आखली होती. मात्र नव्या नेत्यांना आपल्या मर्जीतील आमदारांना संधी द्यायची असल्यामुळे भाजपात अंतर्गत कलह वाढल्याचे समजते. मंत्रिमंडळात नव्या चेहऱयांना पसंती दिली जाणार असल्यामुळे पक्षाचे जुने वरि÷ मंत्री नाराज होऊ शकतात. साहजिकच रुपाणी यांच्या काळातील मंत्र्यांची पदे जाणार आहेत.

गुजरातमध्ये अचानक मुख्यमंत्री बदलल्याने पक्षात खळबळ उडालेली असताना नवनियुक्त मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमडळाचा शपथविधी ऐनवेळी पुढे ढकलावा लागला आहे. गुजरातमध्ये विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा अचानक राजीनामा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यावर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली होती. यामध्ये भाजपाने भल्या भल्यांचे पत्ते कापत भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केले होते.

Related Stories

दिल्लीकरांसाठी ‘आप’चे ‘हमी पत्र’

Patil_p

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी ठराव करणे हे राज्य सरकारचे केवळ वेळकाढूपणाचे धोरण – देवेंद्र फडणवीस

Abhijeet Shinde

माउंट एव्हरेस्टच्या उंचीबद्दल नेपाळचा नवीन दावा

datta jadhav

5G तंत्रज्ञानाविरोधात जूही चावला दिल्ली हायकोर्टात

datta jadhav

राहुल गांधींसोबतच्या ‘त्या’ फोटोवर संजय राऊत म्हणाले…

Abhijeet Shinde

भारत बायोटेकची ‘नेसल’ लस येणार

Patil_p
error: Content is protected !!