तरुण भारत

डय़ुरँडमध्ये बेंगलोर युनायटेड, एफसी बेंगलोरचे विजय

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

कोलकातात खेळविण्यात येत असलेल्या 130 व्या डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धेतील अ गटातील लीग सामन्यात बेंगलोर युनायटेड एफसी संघाने आपल्या सलग तिसरा विजय नोंदविला. कल्याणी नगरपालिका स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेंगलोर युनायटेड एफसीने मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबला 2-0 गोलानी पराभूत केले.

Advertisements

पहिल्या सत्रात उभय संघ गोलशून्य बरोबरीत खेळत होते. सामन्याच्या 65व्या मिनिटाला बेंगलोर युनायटेड एफसी थॉकचोम जेम्स सिंगने हेडींगने गोल करून संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर इंज्युरी वेळेच्या आठव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर स्लोवाकियाच्या लुका माजसीनने गोल करून बेंगलोर युनायटेड एफसीचा विजय सोपा केला.

या विजयाने बेंगलोर युनायटेड एफसी तीन गुण प्राप्त झाले. त्यांचे आता 3 सामन्यांतून 9 गुण झाले असून ते अ गटात पहिल्या स्थानावर आहेत. मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबचा हा तिसऱया सामन्यातील पहिलाच पराभव आहे. त्यांचे 3 सामन्यांतून 6 गुण झाले असून ते दुसऱया स्थानावर आहेत. याच गटातील इंडियन एअर फोर्स आणि सीआरपीएफ यांच्यातील सामना मोहन बागान ऍथलेटीक क्लबच्या मैदानावर जोरदार पावसामुळे पाणी साचल्याने सोडून देण्यात आला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.

कोलकातातील युवा भारती क्रीडांगण मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेंगलोर एफसीने विजयी सलामी देताना केरळ ब्लास्टर्स संघाचा 2-0 गोलांनी पराभव केला. सामन्याच्या मध्यंतराच्या ठोक्याला नामग्याल भुतियाने गोल करून बेंगलोर एफसीला आघाडीवर नेल्यानंतर 71व्या मिनिटाला लिऑन आगुस्तिने संघाचा दुसरा गोल करून आघाडी वाढविली.

या सामन्यातील दुसऱया सत्रात केरळ ब्लास्टर्सच्या तीन खेळाडूंना लाल कार्ड पडल्याने मैदान सोडावे लागले. प्रथम 64व्या मिनिटाला आर. व्ही. होर्मीफामला व त्यानंतर संदीप सिंग आणि येंड्रेमबाम मिती यांना मैदानाबाहेर काढण्यात आले. या लढतीतील सामनावीर पुरस्कार बेंगलोर एफसीचा गोलरक्षक लारा याला मिळाला. आज गुरूवारी या स्पर्धेत गोकुळम केरळ आणि हैदराबाद एफसी यांच्यात कल्याणी स्टेडियमवर सामना होईल.

Related Stories

पर्रीकरांचा ‘शिष्य’ काय करतोय ? युरी आलेमावने उपस्थितीत केला सवाल

Amit Kulkarni

काँग्रेसतर्फे सद्भावना दिन साजरा

Patil_p

मडगावचे रस्सा आमलेट प्रणेते अशोक नाईक निवर्तले

Omkar B

चोर्लातून बेळगावात जाणाऱया वाहनांची तपासणी

Amit Kulkarni

गोव्यात कोरोना मृतांची संख्या वाढतेय

GAURESH SATTARKAR

खाणी 15 मार्चपूर्वी सुरु करा अन्यथा मोर्चा

Amit Kulkarni
error: Content is protected !!