तरुण भारत

फोंडा पालिकेतर्फे विकासकामांना गती

फोंडा मार्केट प्रकल्प, कचरा प्रकल्पासाठी रू. 4 कोटी मंजूर

प्रतिनिधी /फोंडा

Advertisements

फोंडा शहरातील बुधवार पेठ येथील मार्केट प्रकल्प पुर्णपणे कार्यान्वित करून त्याला गती देण्यासाठी त्वरीत उपाययोजना करण्याच्या हालचाली वेग घेत आहेत. शहरातील वाढत्या कचऱयावर उपाययोजना व मार्केट प्रकल्प या दोन्ही प्रकल्पासाठी सुमारे रू. 4 कोटी रूपये खर्चून गती देण्यात येणार असल्याची माहिती पालीकेचे नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी दिली.

 फोंडा मार्केट प्रकल्पाच्या उभारणीवेळी चार दुकानदारांनी न्यायालयात धाव घेतल्याने निर्माण झालेला गुंताही सुटलेला आहे. मॅझनाईड फ्लोरच्या जोडणी  बांधकाम रू. 1 कोटी 43 लाख खर्चुन येत्या काही दिवसात सुरूवात होणार आहे. जीसुडा अंतर्गत हे काम पुर्ण करण्यात येणारआहे. त्यामुळे अंडरग्राऊड पार्किगसाठी वाट मोकळी होणार आहे. तसेच बायो मॅकनिकल कचरा प्रकल्पाची उभारणी शहरातील कचरा विल्हेवाटीसाठी करण्यात येणार आहे. रू. 2 कोटी 65 लाख  मंजूर झालेले आहेत. त्यामुळे शहर परिसरासह लगतच्या ग्रामिण भागातील काही पंचायत प्रभागालाही आपल्या कचऱयावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यावर फायदा होणार आहे. त्याशिवाय फोंडा शहरासाठी बाहय़ विकास आराखडयावरही तज्ञ अधिकाऱयाबरोबर बैठका, नवीन मार्केट प्रकल्पातील दुकानासंबंधी व इतर विकासकामांवर चर्चा पालीका मंडळाच्या बैठकीत घेतल्यानंतर पुढील कृती ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले.

Related Stories

साटरे डोंगराळ भागातून गढूळ पाण्याचा प्रवाह

Amit Kulkarni

सांखळीत आज पाच दिवसीय गणेशमूर्तींचे विसर्जन

Amit Kulkarni

पालयेत ‘स्वयंपूर्ण गोवा’ अंतर्गत महिलांसाठी शिबिर

Amit Kulkarni

श्रीस्थळचा वार्षिक भजनी सप्ताह 1 ऑगस्ट पासून सुरू

Amit Kulkarni

विकासाची घोडदौड सुरु ठेवण्यास भाजप हवा

Amit Kulkarni

आधुनिक गोव्याच्या जडणघडणीत ‘दिष्टावो’ महत्त्वपूर्ण ठरणार

Patil_p
error: Content is protected !!