तरुण भारत

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांना भरपाई द्या

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱयांची निदर्शने

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

मान्सूनच्या दमदार पावसामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱयांना दुबार पेरणी करावी लागली. त्याचबरोबर पुन्हा आर्थिक खर्च करावा लागला. शेतीबरोबरच घरे पडूनही मोठे नुकसान झाले. तेव्हा नुकसानग्रस्त शेतकऱयांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी नेगील योगी रयत संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेही शेतकऱयांनी केली.

यावषी सुरुवातीलाच दमदार पावसामुळे जिह्यामध्ये अनेक ठिकाणी पूर आला. त्या पुरामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले. सरकारने सर्व्हे करण्याचा आदेश दिला. मात्र अधिकाऱयांनी योग्यप्रकारे सर्व्हे केला नाही. त्यामुळे अजूनही शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळाली नाही. एक तर महागाईमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. केंद्र सरकारनेही जाचक कायदे केले आहेत. त्यामुळे शेतकरी धोक्मयात आले आहेत. तेव्हा ते कायदेही रद्द करावेत, यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बिराप्पा देशनूर, बसवराज मोकाशी, रवी पाटील, मंजू किडनाळ, मल्लय्या पूजार, इराप्पा उळ्ळीगेरी, प्रसाद कुलकर्णी, रुद्रगौडा पाटील, मल्लाप्पा शिगीहळ्ळी, मंजु गौडर, निलव्वा शिंत्री  यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ

Amit Kulkarni

हरिभाऊ वझे यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

Amit Kulkarni

भाजी – फळे विक्रेत्यांवरची कारवाई मागे घ्यावी

Patil_p

नूतन पोलीस आयुक्तांचा बार असोसिएशनतर्फे सत्कार

Amit Kulkarni

आरपीडी कॉर्नर येथे पिझ्झा हटचे उद्घाटन

Amit Kulkarni

शंकरगौडा पाटील यांच्या वाढदिनी विविध उपक्रम

Omkar B
error: Content is protected !!