तरुण भारत

ईशानने सुरू केले ‘पिप्पा’चे शूटिंग

फर्स्ट लुक पोस्टर केला शेअर

शाहिद कपूरचा छोटा भाऊ आणि अभिनेता ईशान खट्टर मागील काही काळापासून स्वतःचा आगामी चित्रपट ‘पिप्पा’वरून चर्चेत आहे. ईशानने आता या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. यासंबंधीची माहिती त्यानेच सोशल मीडियावर चित्रपटातील स्वतःचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर करत चाहत्यांना दिली आहे.

Advertisements

“हे अत्यंत विशेष ठरणार आहे. पिप्पाचे चित्रिकरण सुरू झाले आहे’’ असे त्याने नमूद केले आहे. तर शाहिद कपूरनेही ईशानच्या पोस्टवर कॉमेंट केली आहे. ईशान अमृतसरमध्ये या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. राजा मेनन यांचे दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे. रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ  रॉय कपूर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

या चित्रपटात ईशानसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील दिसून येईल. या दोघांसोबत चित्रपटात प्रियांशू पेनयुली आणि सोनी राजदान देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाला ए.आर. रहमान यांचे संगीत लाभणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात झळकणार आहे.

‘पिप्पा’ हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. ब्रिगेडियर बलराम सिंह मेहता यांचे पुस्तक ‘द बर्निंग चॅफिस’चा संदर्भ घेत हा चित्रपट तयार केला जातोय. चित्रपटात ईशान ब्रिगेडियर मेहता यांची भूमिका साकारत आहे.

Related Stories

डिसेंबरमध्येच होणार रणबीर-आलियाचं लग्न?

Omkar B

कंगनाचे मुंबईतील कार्यालय पालिकेकडून सील

Rohan_P

डिस्नेविरोधात स्कार्लेट जॉन्सनचा खटला

Patil_p

तेजश्रीच्या डोळ्यांनी कुणीतरी पाहणार जग

Patil_p

आता रश्मी अनपट दिसणार आर्याच्या भूमिकेत!

Rohan_P

‘मन उडू उडू झालं’.

Patil_p
error: Content is protected !!