तरुण भारत

रिलायन्सच्या मुकेश अंबांनींकडून निर्णयाचे स्वागत

मुंबई : दूरसंचार क्षेत्राकरीता सरकारने 100 टक्के थेट विदेशी गुंतवणूकीस मुभा देण्याच्या निर्णयाचे रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबांनी यांनी स्वागत केले आहे. टेलिकॉम क्षेत्रासाठी सदरचा निर्णय दिलासादायक ठरला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रत्येक भारतीयाचे जगणे सुसह्य़ व्हावे व प्रत्येक क्षेत्राला प्रगती करून अर्थव्यवस्थेत हातभार लावता यावा यासाठी सरकारने घेतलेला निर्णय फलदायी ठरणारा असणार आहे, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. बुधवारी पेंद्रीय मंत्रिमंडळाने टेलिकॉम क्षेत्रासाठी एफडीआयची घोषणा केली होती. त्यासंदर्भात प्रतिक्रीया देताना ते बोलत होते. अर्थव्यवस्थेत दूरसंचार क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे ठरत असून डिजिटल इंडियाच्या योगदानात या क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा असणार आहे. नव्या धोरणाबाबत पाऊल उचलल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले.

Advertisements

Related Stories

ऍपल-रियलमीसह अन्य स्मार्टफोनच्या किमती वाढल्या

Patil_p

सेन्सेक्स 627 अंकांनी घसरला

Patil_p

जग्वार लँड रोव्हरच्या वाहन विक्रीत वाढ

Patil_p

डाबरकडून बेबी पावडर-बेबी लोशनसह अन्य 8 उत्पादने सादर

Omkar B

नोकियाकडून 5-जी उपकरणांची निर्मिती सुरु

Patil_p

बांधकाम उद्योग सावरायला सुरुवात

Patil_p
error: Content is protected !!