तरुण भारत

ऑगस्टमध्ये निर्यात 45 टक्के वाढली

आयातीत 51 टक्के वाढः रत्ने, दागिने, पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisements

ऑगस्टमध्ये निर्यातीच्या टक्केवारीत 45 टक्के वाढ दिसून आली आहे. जी चार महिन्यांच्या स्तरावर पाहता सर्वोच्च मानली जात आहे. यासोबत आयातही वाढली आहे.

भारताची निर्यात ऑगस्टमध्ये 45.76 टक्के वाढून 33.28 अब्ज डॉलर्सची झाली आहे. अभियांत्रिकी, पेट्रोलियम उत्पादने, रत्ने व दागिने तसेच रासायनिक उत्पादनांच्या निर्यातीत चांगली वाढ दिसली आहे. एक वर्षापूर्वी ऑगस्टमध्ये 22.83 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली होती.

आयातीतही वाढ

दुसरीकडे आयात ऑगस्टमध्ये 51.72 टक्के वाढून 47.09 अब्ज डॉलर्सची झाली आहे. एक वर्षापूर्वी सदरच्या महिन्यात 31.03 अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली होती. याचप्रकारे ऑगस्टमध्ये व्यापारी तोटा वाढून 13.81 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता.

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट काळात एकूण निर्यात 67.33 टक्के वाढून 164.10 अब्ज डॉलर्सची झाली आहे. याआधीच्या वर्षात समान अवधीत निर्यात 98.06 अब्ज डॉलर्सची झाली होती. तर एप्रिल-ऑगस्ट कालावधीत 219.63 अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली. जी मागील वषी याच कालावधीत 121.42 अब्ज डॉलर्सची होती.

सोने आयातीत 82 टक्के वाढ याचप्रमाणे ऑगस्टमध्ये कच्च्या तेलाची आयात 80 टक्के वाढून 11.65 अब्ज डॉलर्सची झाली आहे. तर सोने आयातही 82 टक्के वाढून 6.75 अब्ज डॉलर्सची झाली आहे. अभियांत्रिकी उत्पादनांची निर्यात ऑगस्टमध्ये वाढली होती.

Related Stories

उद्योगांमुळे वीज मागणी वाढली

Patil_p

एफएमसीजी क्षेत्राची दमदार वाटचाल

Patil_p

रिलायन्सच्या मुकेश अंबांनींकडून निर्णयाचे स्वागत

Amit Kulkarni

भारतीयांना यंदा रिलायन्स जिओची 5 जी भेट

Patil_p

होम फर्स्टचा आज आयपीओ बाजारात

Patil_p

दुसऱया सत्रात सेन्सेक्सची 497 अंकांची तेजी

Patil_p
error: Content is protected !!