तरुण भारत

सेन्सेक्स प्रथमच 59,000 च्या उंचीवर

इंडसइंड बँक मजबूत; विदेशी गुंतवणुकीचा प्रभाव

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ातील चौथ्या दिवशी गुरुवारी भारतीय भांडवली बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक यांच्या कामगिरीच्या जोरावर दिवसअखेर सेन्सेक्सने तब्बल 417.96 अंकांच्या तेजीसह नवा उच्चांक प्राप्त केल्याचे पहावयास मिळाले आहे. तर निफ्टीही तेजीसह बंद झाला. दुसऱया बाजूला विदेशी संस्थांकडून सुरू असणाऱया गुंतवणुकीच्या प्रवाहामुळे भारतीय भांडवली बाजारात तेजीचे वातावरण कायम राहिले असल्याचे दिसून आले आहे.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 417.96 अंकांच्या मजबुतीसह 0.71 टक्क्मयांनी वधारत निर्देशांक 59,141.16 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी 110.05 अंकांसह 0.63 टक्क्मयांनी भक्कम होत निर्देशांकाने 17,629.50 चा टप्पा प्राप्त केला आहे.

प्रमुख कंपन्यांपैकी इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक म्हणजे तब्बल सात टक्क्मयांनी वधारून सर्वोच्च स्थान प्राप्त केले असून अन्य कंपन्यांपैकी आयटीसी, स्टेट बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला टीसीएस, टेक महिंद्रा, टाटा स्टील, भारती एअरटेल, एचसीएल टेक आणि डॉ. रेड्डीज लॅब यांचे समभाग मात्र घसरणीत राहिले होते.

विदेशी बाजारातील स्थिती

जागतिक प्रमुख बाजारांपैकी आशियासह अन्य बाजारात शांघाय, सिओल, टोकियो आणि हाँगकाँग हे बाजार प्रामुख्याने नुकसानीत राहिले आहेत. दुसरीकडे युरोपीय बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी संस्थांकडून गुंतवणूक करण्यासाठी भांडवली बाजारात निव्वळ लिलाव करण्यात आले आहेत. यामध्ये बुधवारी 232.84 कोटी रुपयांच्या मूल्याच्या समभागाची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.16 टक्क्मयांच्या तेजीसोबत 75.58 डॉलर प्रतिबॅरेलवर राहिले आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

 • इंडसइंड बँक. 1130
 • आयटीसी……. 230
 • एसबीआय…… 463
 • रिलायन्स….. 2428
 • कोटक महिंद्रा 1906
 • आयसीआयसीआय 727
 • आयओसी……. 118
 • हिरो मोटो कॉर्प. 2920
 • ऍक्सिस बँक…. 802
 • एचडीएफसी लाईफ….. 755
 • एसबीआय लाईफ 1184
 • बजाज ऑटो.. 3813
 • पॉवरग्रिड कॉर्प 179
 • एचडीफसी बँक 1559
 • कोल इंडिया…. 162
 • आयशर मोटर्स 2860
 • अदानी पोर्टस्.. 769
 • मारूती सुझुकी 6930
 • लार्सन टुब्रो… 1721
 • महिंद्रा आणि महिंद्रा     756
 • ओएनजीसी…. 128

समभाग घसरलेल्या कंपन्या

 • बीपीसीएल … 439
 • ग्रेसीम………. 1578
 • टीसीएस…… 3903
 • टाटा स्टील…. 1436
 • श्री सिमेंटस् 30660
 • टेक महिंद्रा… 1448
 • युपीएल……… 754
 • जेएसडब्ल्यू स्टील 689
 • भारती एअरटेल 718
 • विप्रो…………. 667
 • एचसीएल टेक 1263
 • हिंडाल्को…….. 483
 • अल्ट्राटेक सिमेंट 7765
 • डॉ. रेड्डीज लॅब्ज 4931
 • बजाज फिनसर्व्ह 16733
 • इन्फोसिस…. 1702
 • टायटन…….. 2108
 • नेस्ले………. 20027
 • ब्रिटानिया…. 4073
 • एशियन पेंटस् 3342
 • एचयुएल       2768

Related Stories

तीन रंगात बजाज पल्सर सादर

Patil_p

बँकांच्या कामगिरीने बाजारात परतला उत्साह

Patil_p

आता एसएमएसच्या आधारे जीएसटी परतावा

Patil_p

मर्सीडीझ बेंझची नवी योजना

Patil_p

कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात

Patil_p

संदीप सिक्कांची सीईओपदी पुनर्नियुक्ती

Patil_p
error: Content is protected !!