तरुण भारत

गायब फाईल पोहोचली पालिकेत

‘तरुण भारत’च्या वृत्तानंतर खळबळ : नगरसेवकाच्या चेहऱयावरील ‘सुहास्य’ गायब,सभासचिवांनी घेतले कर्मचाऱयास फैलावर

प्रतिनिधी /सातारा

Advertisements

सातारा पालिकेत सभेमध्ये घेण्यात आलेल्या विषयांच्या ठरावाच्या फाईलीची एका नगरसेवकाने घरी नेल्याची कुजबुज गेल्या पाच दिवसांपासून सुरु होती. त्याचे वृत्त ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध करताच कायम हसऱया चेहऱयाने फिरत असलेल्या त्या नगरसेवकाने सकाळी 11.30 वाजता सातारा पालिकेत स्वतः फाईल आणून दिल्या. दरम्यान, ज्या कर्मचाऱयाने फाईली दिल्या त्या कर्मचाऱयास सभासचिव श्रीमती भोसले यांनी चांगलेच फैलावर घेतले. ‘तरुण भारत’च्या वृत्तानंतर फाईल आपोआप पालिकेत पोहचल्याबाबतची चर्चा पालिकेत रंगली होती.

सातारा पालिकेच्या निवडणुकीला काही महिने उरले आहेत. सत्ताधाऱयांना सातारकर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणून काळजी घ्यावी लागणार आहे. विरोधकांनाही सांभाळून घ्यावे लागणार आहे. यामध्ये मोठा कस लागणार आहे. असे असताना गेल्या पाच दिवसांपूर्वी सातारा पालिकेतून सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आलेल्या विषयाची फाईलच चक्क एका नगरसेवकाने घरी नेवून ठेवली. त्या फाईलबाबत गेल्या चार दिवसांपासून जोरदार चर्चा सरु होती. सभा सचिव श्रीमती भोसले यांना तर फाईल नेल्यामुळे झोप उडाली होती. फाईल परत आणून द्या म्हणून त्या नगरसेवकास दररोज फोन करुन विनंती करत होत्या. परंतु त्यांना तसा प्रतिसाद मिळत नव्हता. तर विरोधी नगरसेवक फाईल परत कधी येणार अशी विचारणा करत होत्या. त्यामुळे यामध्ये सभा सचिव श्रीमती भोसले येंचे मधल्यामध्येच कोंडी झाल्याची जोरदार चर्चा सुरु होती. ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करताच गुरुवारी सातारा पालिका वर्तुळात खळबळ उडाली. चेहऱयावरील ‘सुहास्य’ हरवलेल्या त्या नगरसेवकाने सकाळी 11.30 वाजता आणून पोहोच केली. फाईल देणाऱया कर्मचाऱयाची चांगलीच झाडाझडती सभासचिव भोसले यांनी घेतली.

‘तरुण भारत’च्याच बातमीची दिवसभर चर्चा अन् कार्यालयात फोन सातारा पालिकेमध्ये घडलेल्या घटनेचे वृत्त प्रसिद्ध करताच दिवसभर कोणी घरी फाईल नेर्लीं. ती फाईल परत आणली का?, घरी फाईल नेता येते का?, अशी पालिकेत चर्चा सुरु होती. दरम्यान, सातारा पालिकेच्या काही नगरसेवकांनी ‘तरुण भारत’च्या कार्यालयात फोन करुन विचारणा केली.

Related Stories

कराडच्या दोन्ही प्रवेशद्वारावर चेकपोस्ट

Patil_p

सातारा : लोणंदच्या बाजार समितीत ‘गरवा कांद्या’ला उच्चांकी दर !

Abhijeet Shinde

जातीनिहाय जनगणना व्हावी; ओबीसी संघटनेची मागणी

datta jadhav

डंपर चालकास लुटणाऱया सराईत चोरटय़ास अटक

Patil_p

सातारा : मोक्क्यातील आरोपीचा अप्पर पोलीस अधिक्षकांसमोर आत्महत्येचा प्रयत्न

datta jadhav

सातारा : लॉकडाऊनच्या भात्यातील शेवटचा दिवस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!