तरुण भारत

सातारा शहरात संसर्ग आटोक्यात; 335 रुग्ण ऍक्टिव्ह

ग्रामीण भागात 346 रुग्ण ऍक्टिव्ह, आयसोलेट 89, कोरोना सेंटरमध्ये 549, प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये 82

प्रतिनिधी /सातारा

Advertisements

सप्टेंबर महिन्यापासून जिल्हय़ातील कोरोना स्थिती आटोक्यात येत असून हॉटस्पॉट ठरलेल्या सातारा तालुक्यातील स्थितीही सुधारत आहे. गेल्या पाच, सहा दिवसांपासून सातारा तालुक्यात दोन अंकी वाढ समोर येत आहे. सध्या सातारा तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 749 एवढी आहे. यामध्ये ग्रामीण भागात 346, शहरी भागात 335, होम आयसोलेट 89, कोरोना सेंटरमध्ये 549, प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये 82 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. एच. पवार यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून सातारा तालुक्यातील तीन अंकी बाधित वाढ थांबली असून दोन अंकी संख्येवर ती आल्याचा दिलासा आहे. आजमितीस सातारा तालुक्यात 3 लाख 98 हजार 595 जणांची तपासणी झाली असून त्यापैकी 3 लाख 54 हजार 18 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला तर बाधितांची एकूण संख्या 50 हजार 442 एवढी आहे. त्यापैकी 48 हजार 677 जणांनी कोरोनावर मात करत लढाई जिंकलीय. यामुळे साताऱयाचा रिकव्हरी रेट 96.27 टक्के एवढा चांगला आहे. तर एकूण 1 हजार 455 जणांचा मृत्यू झाला असून ग्रामीण भागात 742, शहरी भागात 503 तर जिल्हय़ाबाहेरील 208 जणांचा समावेश यात आहे.

सातारा शहरात 18 हजार 148 बाधित

सातारा शहरात असलेले विविध हॉस्पिटल्स, त्यामध्ये जिल्हाभरातून येणारे रुग्ण, नातेवाईक तसेच जिल्हय़ाबाहेरील नागरिक यामुळे संसर्ग वाढ होतच राहिली. यामध्ये शहरात 18 हजार 898 बाधित झाले आहेत. तर बाहेरील जिल्हय़ातील शहरात असलेल्या बाधितांची संख्या 2 हजार 103 असून हा आकडा 20 हजारांकडे जातो. मात्र त्यापैकी 18 हजार 60 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

वेग मंदावत असल्याचा दिलासा

ऑगस्टच्या मध्यापासून बाधित वाढ मंदावत असली तरी ती सातारा तालुक्यात ती तीन अंकी संख्येने वाढत होती. मात्र आता सप्टेंबर महिन्यात चांगला दिलासा लाभला असून बाधित वाढ दोन अंकी संख्येवर आली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात बाधितांचा आकडाही घटला असून दि. 15 रोजीपर्यंत एकूण 678 नवीन बाधित समोर आलेले होते. वेग मंदावला असला तरी अद्याप काही काळ तरी सातारकरांना काळजी घ्यावी लागणारच आहे.

होम आयसोलेशन बंद केल्याने वाढीत घट

सातारा शहर व तालुक्यातील होम आयसोलेशन बंद केल्याने रुग्ण वाढीत बरीच घट झालीय. आजमितीस 749 ऍक्टिव्ह रुग्ण संख्या आहे. मात्र, त्यापैकी 89 रुग्ण होम आयसोलेट आहेत. तर 549 हे संस्थात्मक विलगीकरण व ग्रामीण भागात सोय करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये आहे तर कोरोना केअर सेंटरमध्ये 29 रुग्ण दाखल आहेत. प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये फक्त 82 रुग्ण शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. सातारा कोरोनामुक्त करायचा असेल तर गर्दी टाळून, कोरोनाचे नियम पाळण्याची गरज डॉ. पवार यांनी व्यक्त केली.

Related Stories

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग नव्हेच हा तर पाणंद रस्ता

triratna

वाई तालुक्यात नव्याने 81 जण बाधित

Patil_p

फौजदार भरत नाळे यांचा राष्ट्रपती पदकाने होणार गौरव

Patil_p

फोटोंचा गैरवापर करुन निर्मात्याची बदनामी

Patil_p

खेड पिरवाडी परिसरातील २० डंपर कचरा पालिकेने उचलला

triratna

वनमजुराला दमदाटी करून दांडक्याने मारहाण

datta jadhav
error: Content is protected !!