तरुण भारत

साविआ अन नविआतच पालिकेच्या निवडणूकीपूर्वीच रंगू लागला फड

वातावरण लागले तापू : आमदार शिवेंद्रसिंहराजे गत निवडणूकीचा उट्टे काढण्याच्या तयारीत.खासदार उदयनराजेंकडून साविआ चार्ज करण्याचा प्रयत्न, भाजपसाठी ठरणार डोकेदुखी तर राष्ट्रवादीला मिळणार आयती संधी,दोन्ही आघाडीतील नाराज राष्ट्रवादीच्या संपर्कात

प्रतिनिधी /सातारा

Advertisements

पालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता गृहीत धरून सातारा शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा गट गतवेळी झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्याच्या तयारीला लागला आहे. खासदार उदयनराजे हे स्वतः मरगळ आलेल्या सातारा विकास आघाडीला रिचार्ज करत आहेत. दोन्ही आघाडय़ाकडून आगामी पालिका निवडणुकीच्या फडाची जोरदार कसरत सुरू झाली आहे. दोन्ही आघाडीतील नाराज  मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. हे सध्या चित्र दिसत आहे.

सातारा पालिकेची निवडणूक ही काही वर्षे मनोमिलनातून झाली होती. त्यानंतर मागच्या पाच वर्षांपूर्वी सातारा विकास आघाडी विरुद्ध नगरविकास आघाडी व भाजप अशी तीन पक्षीय झाली होती. नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सातारा विकास आघाडीच्या विध्यमान नगराध्यक्ष माधवी कदम या होत्या. नविआच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार वेदांतिकाराजे तर भाजपच्या उमेदवार सुवर्णादेवी पाटील होत्या. गतवेळीच्या निवडणूकीत सुरुवातीला वेदांतिकाराजे यांच्या बाजूने वातावरण तयार झाले होते. त्याच नगराध्यक्ष होणार असे भाकीत ही काही मंडळींनी वर्तवली होती पण प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सगळाच नूर पालटला होता. खासदार उदयनराजे यांनी जी दिशा दिली व नगराध्यक्षा माधवी कदम यांनी त्यावेळी केलेली भाषण, पदयात्रा सातारकराना भोवली अन सातारा विकास आघाडी सत्तेत आली. गेल्या पावणे पाच वर्षात सातारा विकास आघाडीकडून सातारच्या विकासासाठी प्रस्तावित नवीन इमारत, भुयारी गटर, ग्रेड सेपरेटर, कास धरण उंची, हद्दवाढ हे आणल्याचा दावा केला जात आहे. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे गटाकडुन सुरुवातीपासून कसे सत्ताधारी फेल ठरले हे वारंवार आरोप केले जात आहेत. सभागृहात नगराध्यक्षा माधवी कदम यांना खिंडीत गाठण्यासाठी प्रयत्न केला जातो. आता पालिकेच्या निवडणूका काही महिन्यानी होतील अशी शक्यता गृहीत धरून शहरातील राजकारण तापू लागले आहे. दोन्ही आघाडीचे नेते भाजपमध्ये असले तरीही एकमेकांवर मोका मिळताच टिप्पणी करण्याचे दोन्ही आघाडय़ा सोडत नाहीत. दोन्ही आघाडीकडून कसून कसरत सुरू झाली आहे. विशेष करून नव्याने हद्दीत आलेल्या भागावर दोन्ही नेत्यांनी लक्ष केंद्रित केले असून काही ठिकाणी नारळ फुटले जात आहेत, उद्घाटन केली जात असून त्यातुन थेट एकमेकांवर टिप्पणी केली जात आहे. त्यामुळे पालिका निवडणूका जवळ आल्या आहेत अशी चाहूल सातारकर नागरिकांना लागली आहे.

नाराज मंडळी राष्ट्रवादीच्या संपर्कात

सातारा शहरात जरी राजे फॅक्टर चालत असला तरी त्यांना विरोध करणारे म्हणून दीपक पवार हे एकमेव नाव घेतले जात होते आता त्यांच्या जोडीला आमदार शशिकांत शिंदे हे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस सातारा शहरात छुप्या रीतीने हातपाय पसरत आहे.अगदी विध्यमान दोन्ही आघाडीतील काही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. त्यामुळे दोन्ही राजे जरी आता एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करत असले एकमेकांच्या विरोधात पालिकेत काम करत असले तरीही कार्यकर्त्यांनी बरेच चटके सहन केलेले आहेत. त्यामुळे दोघांच्या वादाचा फायदा राष्ट्रवादीला होईल अशी चर्चा सुरू आहे.

भाजपसाठी डोकेदुःखी

खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे हे दोघे ही जरी भाजपमध्ये असले तरी दोघांचे कार्यकर्ते अजून ही भाजपमध्ये नाहीत असेच चित्र आहे. त्यात दोन्ही राजांमधील कलह वारंवार सातारकर पहातात. आता ही दोन्ही राजे एकमेकांच्या आघाडीवर बोलू लागले आहेत. त्यामुळे ही भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

नवीन चेहयाकडून तयारी सुरू

सातारा शहरात दोन्ही आघाडीमध्ये अनेक वर्षे सातारा पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेलेच नगरसेवक दिसतात. त्यावर दोन्ही आघाडीकडून नवीन चेहरे आपल्याला राजे यावेळी वॉर्डातून तिकीट देतील यासाठी खटपट सुरू केली आहे. त्यामुळे निवडणूका अजून पत्ता नसला तरी दोन्ही आघाडीमध्ये नवीन इच्छुक चेहयाची भाऊगर्दी दोन्ही वाडय़ावर होत आहे. दोन्ही वाडय़ाने झिडकारले तर राष्ट्रवादी आहेच अशा तयारीने इच्छुक तयारी करत आहेत.

Related Stories

‘किसनवीर’च्या स्थितीवरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

Patil_p

बॉम्बे रेस्टारंट पुलाखाली दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

datta jadhav

सातारा-पंढरपूर बसवर टवाळखोरांकडून दगडफेक; दरोडा नाही…

datta jadhav

पर्यावरणासाठी सरसावली सातारची लेक

Amit Kulkarni

टप्प्याटप्याने प्रकरणे बाहेर काढणार

Patil_p

गावठाणातील बांधकामांना जिल्हा परिषदेची नियमावली

Amit Kulkarni
error: Content is protected !!