तरुण भारत

प्रत्येकाने आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज

डॉ. अशोक शेट्टर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

माहिती तंत्रज्ञानात मोठे बदल झाले आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रांनीही कात टाकली आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल आदी अभियांत्रिकी विभागातही नवे तंत्रज्ञान आले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने तंत्रज्ञान आत्मसात करावे, बदल स्वीकारावा न हून खडतर परिस्थितीचा सामना करावा लागेल, असे आवाहन हुबळी येथील केएलई तांत्रिक विद्यापीठाचे डॉ. अशोक शेट्टर यांनी केले.

बेळगाव इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्सच्यावतीने इंजिनिअर्स डे व सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या 161 व्या जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शिक्षण क्षेत्रातही आमूलाग्र बदल झाले असून शिक्षण संस्थांनी बदल स्वीकारले आहेत. विद्यार्थ्यांनी बदलते तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अरविंद गलगली, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंते बी. वाय. पवार, बाळकृष्ण गोडसे, पुंडलिक नंदगावी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात उत्तम सेवा बजावलेल्या अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला. इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्सचे चेअरमन रमेश जंगल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. व्यंकटेश यांनी स्वागत केले. सी. बी. हिरेमठ यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत अंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. बी. जी. धरणी यांनी आभार मानले.

Related Stories

अर्धवट रस्त्यांचे काम पावसाळय़ापूर्वी पूर्ण करावे

Patil_p

गुडस ग्राम पंचायतीचा क्लार्क एसीबीच्या जाळय़ात

Amit Kulkarni

पंधराव्या वित्त आयोग अनुदानात यंदा कपात

Amit Kulkarni

क्वारंटाईनमधील नागरिकांची संख्या वाढतीच

Patil_p

बेळगावमधून दुबईला पोहचता येणार 7 तासांमध्ये

Patil_p

जितो लेडिज विंगतर्फे ‘पहचान’ वेबिनार

Amit Kulkarni
error: Content is protected !!