तरुण भारत

गणपतीपुळेत बुडून सांगलीतील तरूणाचा मृत्यू

वार्ताहर/गणपतीपुळे

गणपतीपुळे येथील समुद्रात गुरूवारी सकाळी 11 च्या सुमारास सांगलीतील तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तर दुसऱया तरुणाला वाचवण्यात समुद्रकिनाऱयावरील गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या जीवरक्षकांना यश आले.

Advertisements

  प्रणेश मुकुंद वसगडेकर, (23, रा. सांगली) असे बुडून मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर पृथ्वीराज पाटील (25) असे वाचवण्यात आलेल्या दुसऱया तरुणाचे नाव आहे. गणपतीपुळे येथे सांगली व कोल्हापूर येथील 4 मित्र बुधवारी सायंकाळी गणपतीपुळे येथे आले होते. यावेळी गणपतीपुळे येथे एका खासगी लॉजमध्ये त्यांनी निवास केल्यानंतर गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास त्यांनी गणपतीपुळे समुद्रात आंघोळीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. आंघोळीसाठी यातील दोन तरुण उतरले असता त्यांनी खोल समुद्रात पोहण्याचा प्रयत्न केला. त्यामधील प्रणेश वसगडेकर  हा खोल समुद्रात गेल्याने गटांगळ्Îा खाऊ लागला.

  यावेळी समुद्रकिनाऱयावर असलेले त्याचे मित्र ओंकार मेहतर (28, रा. कोल्हापूर) व वैभव जगताप (24, रा. सांगली) यांनी आरडाओरड केल्याने गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे डÎुटीवर असणारे जीवरक्षक रोहित चव्हाण, विशाल निंबरे, अनिकेत चव्हाण, विक्रम राजवाडकर, उमेश म्हादये, अक्षय माने आदींनी समुद्रात उडÎा घेऊन दोन्ही युवकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यातील प्रणेश वसगडेकर याला पाण्याबाहेर बाहेर काढल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने जीवरक्षकांनी त्याच्या नाका-तोंडात गेलेले पाणी काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देवस्थानच्या ऍम्बुलन्सने तातडीने त्याला मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. मात्र प्रणेश वसगडेकर याचा मृत्यू झाला. तर बुडणाऱया पृथ्वीराज पाटील याला सुरक्षितरित्या पाण्याबाहेर काढण्यात यश आले.

 पर्यटकांचा अतिउत्साह बेततोय जीवावर

यावेळी जीवरक्षकांच्या मदतीसाठी विश्वास सांबरे यांच्यासह स्थानिक फोटो व्यावसायिक रुपेश पाटील, अक्षय कनगुटकर, वैभव पवार, नितीन म्हादये, गंगाराम शिंदे, किसन जाधव आदींनी प्रयत्न केले. गणपतीपुळे पर्यटन स्थळ सुरु झाल्यापासून पर्यटकांची चांगलीच वर्दळ सुरू आहे. मात्र समुद्रकिनाऱयावर मौजमजा करण्यासाठी उतरणारे पर्यटक अतिरेक करण्याचा प्रयत्न करतात. त्यातील अतिउत्साही तरुण समुद्राच्या खोल पाण्यात जाऊन पोहण्याचा प्रयत्न करतात, मात्र हाच प्रयत्न गुरूवारी दोन तरुणांच्या जीवावर बेतला.

 याविषयीची माहिती गणपतीपुळे पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे मधुकर सलगर व सागर गिरीगोसावी यांनी पंचनामा करून मृत झालेल्या तरूणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रत्नागिरी येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. या घटनेचा अधिक तपास गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे हवालदार राहुल जाधव करीत आहेत. 

Related Stories

रत्नागिरी : कौस्तुभ बुटालांतर्फे ऑक्सिजन सिलेंडर प्रणाली होणार कार्यान्वित

Abhijeet Shinde

माडखोलचे सुपुत्र महेश आडेलकर यांना राष्ट्रपती पोलिस पदक

Ganeshprasad Gogate

कोरोनामुळे राजापूर नगर परिषदेच्या 15 कोटींच्या कामांना खीळ

Patil_p

गोव्यात नोकरी करणाऱयांबाब्ता तातडीने तोडगा काढा!

NIKHIL_N

दापोलीकरांच्या पुढाकारातून कोरोना लसीकरण केंद्र

Patil_p

जिल्हय़ात हलक्या पावसाची शक्यता

NIKHIL_N
error: Content is protected !!