तरुण भारत

महाराष्ट्राच्या धर्तीवर वीज खरेदी करार करावा

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडे मागणी : चिकोडीच्या सी. बी. कोरे साखर कारखान्याकडून निवेदन

प्रतिनिधी / चिकोडी

Advertisements

महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटक सरकारने राज्यातील साखर कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांकडून करार करून वीज खरेदी करावी. खरेदी करण्यात येणाऱया विजेला योग्य दर द्यावा, अशी मागणी चिकोडीच्या चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडे करण्यात आली.

शेजारील महाराष्ट्रात साखर कारखान्यांकडून उत्पादित होणारी वीज योग्य दराने सरकारकडून खरेदी केली जाते. कर्नाटक सरकारनेही साखर कारखान्यांकडूक वीज खरेदी करताना खरेदी करारपत्र तयार करावे. कर्नाटकातील साखर कारखान्यांकडून उत्पादित होणारी वीज खरेदीबाबत कर्नाटक वीज प्रसारण निगम बेंगळूर यांच्याशी असलेला करार 31 मार्चला संपला आहे. त्यामुळे साखर कारखान्यातील वीज उत्पादन बंद झाले आहे.

महाराष्ट्र सरकार तेथील साखर कारखान्याकडून उत्पादित होणारी वीज प्रती युनिट 6.64 रुपये दराने खरेदी करीत आहे. त्यामुळे तेथील साखर कारखान्यांचा अधिक लाभ होत आहे. काही दिवसातच कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत असून वीज खरेदीचा करार झाला नाही तर कारखान्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे पुढील 10 वर्षांसाठी वीज खरेदीचा करार करण्यात यावा, याबाबत संबधितांना सूचना देण्यात यावी. कारखाने व शेतकऱयांच्या हितासाठी वीज खरेदी करार करावा, अशी विनंती केली. त्यानंतर सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर, औद्योगिक मंत्री मुरुगेश निराणी यांचीही भेट घेतली.

यावेळी सरकारचे विधान परिषदेतील मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ, सहकारी साखर महामंडळाचे संचालक अमित कोरे, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भरतेश बनवने, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे, संचालक संदीप पाटील उपस्थित होते.

Related Stories

कितीही विरोध झाला तरी, राम मंदिराचे निर्माण होणारच

Patil_p

ऑनलाईन क्रिकेट बेटिंगप्रकरणी विनायकनगर येथे युवकाला अटक

Omkar B

कर्नाटक हायकोर्टाने केंद्राला रोखले

triratna

बेकायदेशीर वाहतूक, कोटीची रक्कम जप्त

Patil_p

दौड साधेपणाने पण उत्साह मात्र अमाप

Patil_p

शहर परिसराला जोरदार पावसाने झोडपले

Amit Kulkarni
error: Content is protected !!