तरुण भारत

कोल्हापूर : प्रेमप्रकरणातून कळंब्यात तरुणीवर गोळीबार

सागर पाटील / कळंबा

कळंबा तलाव परिसरात आज, शुक्रवारी पहाटे एका युवकाने प्रेमप्रकरणातून तरुणीवर गोळीबार केला. छराच्या बंदुकीतून हा हल्ला केल्याची चर्चा कळंबा ग्रामस्थांमध्ये होती. यानंतर गावात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून पोलिसांनी चौकशीसाठी संबंधित युवतीला त्वरित ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी कसून चौकशी करत आहेत. तर गोळीबार करणाऱ्या त्या युवकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पण त्याने राहत्या घरातून पलायन केल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. गोळीबार झाला की नाही या बाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र छराच्या बंदुकीतून हल्ला केल्याची चर्चा नागरिकांच्यात रंगली आहे.

Related Stories

सोशल मीडियावरून ब्लॅकमेल करून आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्यास केली अटक

triratna

यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर

triratna

शिरोळ तालुक्यात २००५ पासून क्षारपड जमीनीचा सर्वेच नाही

triratna

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आता ‘RTPCR’ सक्ती नाही

triratna

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्येही पुईखडी येथे घोडागाडी शर्यती

triratna

“अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नवं युग आणलं”: न्यायमूर्ती अरुण मिश्रा

triratna
error: Content is protected !!