तरुण भारत

”#राष्ट्रीयबेरोजगारदिवस हॅशटॅग चर्चेत”

“मोदी हे तरुणांना बेरोजगार बनवणारे पंतप्रधान”

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

Advertisements

आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांच्यावर अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी शुभेच्छा वर्षाव केला आहे. देशातुन तसेच परदेशातुन त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.शुभेच्छा दिल्या जात असल्या तरी आजचा दिवस युथ काँग्रेसकडून आणखी एका निमित्ताने चर्चेत आणला आहे. नरेंद्र मोदींचा ७१ वा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला जात आहे.

१७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यासंदर्भातील आवाहन काँग्रेस आणि त्यांच्या समर्थकांकडून गुरुवारपासूनच केली जात होती. त्याचा परिणाम आज म्हणजेच मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिसून येत असून #राष्ट्रीयबेरोजगारदिवस या हॅशटॅगमध्ये मोठ्या प्रमाणात युवक ही सहभागी झाले आहेत.

अशा प्रकारे भाजपाकडून २१ दिवसांचं अभियान सुरु करण्यात आलं आहे या अभियानाला विरोध करण्यासाठी युथ काँग्रेसकडून ही मोहीम हाती घेण्यात आलीय. याच्यात युथ काँग्रेस भाजप सत्तेवर आल्यापासुन नकारात्मक निर्णय नागरिकांन समोर ठेवले जाऊन नागरिकाना भाजपच्या नकारात्मक बाजुंमध्ये प्रामुख्याने बेरोजगारीसारखा मुद्दा मोदींच्या वाढदिवसानिमित्त चर्चेत आणला जातोय.

Related Stories

पाकिस्तानच्या गोळीबारात लष्कराचे दोन ‘पोर्टर्स’ ठार

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये 1093 नवे कोरोना रुग्ण; 13 मृत्यू

Rohan_P

हनुमानसारखे पर्वत आणायला घराबाहेर पडू नका : अजित पवार 

prashant_c

शस्त्रक्रिया परवानगीवरून आयएमए आणि आयुष कृती समिती आमने सामने

Rohan_P

पुणे : भारतीय निवडणूक आयोगात संतोष अजमेरा यांची नियुक्ती

Abhijeet Shinde

स्थापना दिन सोडून राहुल गांधी परदेशात

Patil_p
error: Content is protected !!