तरुण भारत

माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पिकपेरा

या योजनेचा लाभ घेण्याचे तहसीलदार अरुण खानोलकर यांचे आवाहन

दोडामार्ग / वार्ताहर:
महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या माझी शेती माझा सात बारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा या योजने अंतर्गत ई-पीक पाहणी मोबाईल अँप डाउनलोड करून स्वताच्या जमिनीतील पिकाची नोंद यावर करावी, असे आवाहन दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांनी केले. तसेच घरोघरी जाऊन स्वतः त्यांनी या संदर्भात खातेदारांना सविस्तर माहिती दिली.
यावेळी तहसीलदार अरुण खानोलकर बोलताना पुढे म्हणाले की, १३ ऑगस्टपासून ही योजना शासना मार्फत सुरू करण्यात आली आहे. मोबाईल मधील प्ले स्टोअरवरून हा अँप डाउनलोड करून घेत त्यात खातेदारांनी आपली माहिती द्यायची आहे. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी देण्यात येणार आहे. या ओटीपीचा समावेश केल्यानंतर शेतकऱ्याने आपल्या शेताच्या पीकपेऱ्याची माहिती नोंद केल्यानंतर फोटोसह माहिती या अँपवर डाउनलोड करायची आहे. जेवढी पिके असतील तेवढी माहिती या अँपवर भरता येणार आहे. आपल्या तालुक्यात पिकाचा प्रकार निवडताना आता निर्भेळ पीक निवडायचे आहे. त्यानंतर या पूर्ण झाल्यावर माहिती अपलोड करायची आहे. त्यानंतर तलाठी याला मंजुरी देणार आहेत. गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यासह तालुक्यातील सर्वच खातेदारांनी या अँपद्वारे नोंदणी करावी असे आवाहन तहसीलदार खानोलकर यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी मंडळधिकारी राजन गवस (9657770350), प्रेमानंद सावंत (9423944775 ) तसेच संबधित सजामधील तलाठ्यांशीही संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार खानोलकर यांनी केले आहे.

Advertisements

Related Stories

ऋणाची परतफेड जिल्हय़ाच्या विकासातून

NIKHIL_N

अविनाश लाड यांच्याकडून राजापूर-लांजासाठी 10 टन धान्य

Patil_p

नवरात्रोत्सवानिमित्त नऊ रणरागिणींच्या कर्तृत्वाचा जागर

NIKHIL_N

आंबा वाहतुकीतील चालक ‘पॉझिटिव्ह’

NIKHIL_N

दुचाकीस्वारांवर पुन्हा पोलीस कारवाई हाती

NIKHIL_N

रुग्णालय स्वच्छता कामासाठी मुदत वाढ

NIKHIL_N
error: Content is protected !!