तरुण भारत

विट्यात आमदार गोपीचंद पडळकर यांची नगरपालिकेसाठी चाचपणी

शुक्रवारी विट्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी : लवकरच भूमिका मांडणार


प्रतिनिधी / विटा

Advertisements

विटा शहरात भारतीय जनता पार्टीची ताकद दखलपात्र आहे. मात्र कार्यकर्त्यांनाच ताकदीचा अंदाज नसल्याने विविध गटात कार्यकर्ते विखुरलेले आहेत. पार्टी विथ डिफरन्स असणाऱ्या भाजपला या सर्व कार्यकर्त्यांची एक मोट बांधण्यात अद्याप ही यश आलेले नाही. त्यामुळेच आगामी नगरपालिका निवडणूकीत भाजपची भूमिका काय असणार ? याबाबत उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्य प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी विट्यात भाजपच्या विविध नेत्यांची भेट घेतली. लवकरच ते अधिकृत भूमिका मांडणार आहेत. त्यांच्या भूमिकेकडे शहराचे लक्ष लागले आहे.

खानापूर तालुक्यात भाजपला मानणारा एक वर्ग आहे. पक्ष म्हणून ग्रामीण भागात मर्यादीत ताकद असली तरी विटा शहरात भाजप दखल पात्र ताकदीचा पक्ष आहे. माजी आमदार पाटील भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आणि मधल्या काळात व्हाया काँग्रेस आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावले आहेत.

या कालावधीत भाजपची शहरातील वाढलेली ताकद कमी झाली. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणूकीत भाजपचा एक तरी नगरसेवक सभागृहात आलेला आहे. माजी नगरसेवक अनिल म. बाबर, दिलीप आमणे, नेहा किशोर डोंबे अशा मान्यवरांनी पक्षाची ताकद कायम ठेवली आहे. मात्र विटा शहराच्या राजकारणात भाजपला मानणारे कार्यकर्ते स्थानिक आघाड्या करूनच निवडणूकीला सामोरे गेले आहेत. त्यातून कधी अशोक गायकवाड कधी माजी आमदार सदाशिव पाटील तर कधी विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्या गटाशी स्थानिक युती करून नगरपालिका निवडणूक लढवणे भाजप कार्यकर्त्यांनी पसंत केले. एकूणच नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या गोटातही हालचाली गतिमान झाल्या आहेत.

Related Stories

सांगली कोरोना रोखण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करा – पालकमंत्री

Abhijeet Shinde

कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांसाठी डिसेंबर अखेर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा

Abhijeet Shinde

नेर्ले-कापुसखेड येथील बिबट्याचा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वनखात्याकडून पाहणी

Sumit Tambekar

सांगलीत एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

Sumit Tambekar

सांगलीत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा

Sumit Tambekar

सांगली जिल्हा बँक : विकास महाआघाडी विरुद्ध भाजपा चुरशीची लढत

Sumit Tambekar
error: Content is protected !!