तरुण भारत

कोल्हापूर : कासेगावात कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

कासेगाव / वार्ताहर

कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सुधीर शिवाजी कदम (वय २५, रा. कुंडलवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. कासेगाव (ता. वाळवा) येथील पुण्याकडे जाणाऱ्या आशियायी महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल आशीर्वाद जवळ महामार्गावर हा अपघात झाला. या अपघाताची नोंद कासेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. काल, गुरुवारी (दि.16) रात्री उशिरा हा अपघात झाला.

याप्रकरणी कार चालक सीताराम प्रकाश नारकर (वय २७, रा. फणसगाव, नारकवाडी ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग (सद्या रा.ठाणे) याच्यावर भरधाव वेगाने कार चालवणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत कासेगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आशियाई महामार्गावर असणाऱ्या कासेगाव येथील आशीर्वाद हॉटेल जवळील महामार्गावरून सुधीर कदम दुचाकीवरून पुण्याकडे जात होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारकारने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत सुधीर कदम हे दुचाकीवरून खाली पडले. अपघातात जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कदम हे पुणे येथे नोकरी करतात. घटनास्थळी कासेगाव पोलिसांनी धाव घेत कारचालकाला ताब्यात घेतले आहे.

Related Stories

आटपाडीत तलाठय़ासह दोघांना अटक

Patil_p

सांगली : इस्लामपुरातील बंडया कुटे गँग’ला मोक्का

triratna

सांगली : मनपा शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शनविना हाल; दोन महिने थांबलेली पेन्शन तात्काळ द्या

triratna

कुंडल मध्ये 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

triratna

नेर्लेत क्षुल्लक कारणावरून एकावर खुनी हल्ला

triratna

कडेगाव शहरातील आठवडी बाजार सहा महिन्यांनी सुरू

triratna
error: Content is protected !!