तरुण भारत

शिवा थापाची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

बळ्ळारी येथील राष्ट्रीय मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप – गौरव बिधुरीचे आव्हान मात्र संपुष्टात, अंकित उपांत्यपूर्व फेरीत

बळ्ळारी / वृत्तसंस्था

Advertisements

पाच वेळचा आशियाई पदकजेता शिवा थापा येथे सुरु असलेल्या पुरुषांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला. पहिल्या फेरीतील अपयश मागे सारत त्याने दमदार विजय संपादन करत आगेकूच केली. येथील विजयासह त्याचे शेवटच्या 16 स्पर्धकांमधील स्थान निश्चित झाले. माजी वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यजेता गौरव बिधुरीचे 57 किलोग्रॅम वजनगटातील आव्हान मात्र संपुष्टात आले.

या स्पर्धेत आसामचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या थापाने स्टील प्लँट स्पोर्ट्स बोर्ड (एसपीएसबी) शुभम ममताचा साखळी लढतीत पराभव केला. शुभमला या लढतीदरम्यान रिंगमध्ये कोसळल्याने वैद्यकीय उपचारही घ्यावे लागले. थापाचा एक पंच बसल्यानंतर शुभमला तोल राखता आला नव्हता.

‘शुभमला वेदना जाणवत आहेत. पण, तो सध्या ठीक आहे. उद्यापर्यंत तो यातून सावरु शकेल’, असे स्पर्धा आयोजन समितीतील वरिष्ठ पदाधिकाऱयाने सांगितले. गौरव बिधुरीचा पराभव मात्र धक्कादायक ठरला. गौरव बिधुरीला हरियाणाच्या सचिनने 4-1 अशा फरकाने मात दिली.

अंकित उपांत्यपूर्व फेरीत

हरियाणाचा आणखी एक मुष्टियोद्धा व दक्षिण आशियाई स्पर्धेतील चॅम्पियन अंकित खतानाने 75 किलोग्रॅम वजनगटात उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. त्याने एकतर्फी साखळी सामन्यात हिमाचल प्रदेशच्या धर्म पालचा पराभव केला.

तेलंगणाच्या सॅव्हिओ डॉमिनिक मायकल (54 किलोग्रॅम) व गोव्याचा अशोक पाटील (67 किलोग्रॅम) यांनीही आपापल्या लढतीत 4-1 अशा फरकाने एकतर्फी बाजी मारली आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सॅव्हिओने झारखंडच्या कृष्णा जोराला मात दिली तर अशोक पाटीलने हिमाचल प्रदेशच्या मोहन चंदरला पराभवाचा धक्का दिला.

चंदिगढच्या कुलदीप कुमार (48 किलोग्रॅम) व सचिन यांनीही सदर राष्ट्रीय स्पर्धेच्या तिसऱया दिवशी आपली आगेकूच कायम राखली. कुलदीपने राजस्थानच्या सुशील सहरनचा 4-0 असा सहज फडशा पाडला. या विजयासह तो उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला.

75 किलोग्रॅम वजनगटात महाराष्ट्राचा मुष्टियोद्धा निखिल दुबे आपली विजयी घोडदौड शुक्रवारीही कायम राखण्यात यशस्वी ठरला. त्याने तेलंगणाच्या वेलू मंडलाची वाटचाल संपुष्टात आणली. रेफ्रींनी ही लढत वेळेपूर्वीच थांबवत निखिलला विजयी घोषित केले. या स्पर्धेतील सुवर्णजेते मुष्टियोद्धे पुढील महिन्यात बेलग्रेड येथे होणाऱया वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी थेट पात्र ठरणार आहेत.

Related Stories

मल्ल सनी जाधवला आर्थिक साहय़

Amit Kulkarni

केकेआरविरुद्ध लढतीत दिल्लीसमोर प्ले-ऑफचे लक्ष्य

Patil_p

स्टॉपेज टाईममध्ये नेमारसह 5 खेळाडूंना रेड कार्ड

Patil_p

पोलंडची स्वायटेक अंतिम फेरीत

Patil_p

#INDvsENG सूर्यकुमार तळपला; भारताचा ८ धावांनी विजय

Abhijeet Shinde

अन् म्हणूनच विजयानंतरही नीशम स्तब्ध बसून राहिला!

Omkar B
error: Content is protected !!