तरुण भारत

‘मला अपमानित झाल्यासारखं वाटतंय’; राजीनाम्यानंतर अमरिंदर सिंगांची प्रतिक्रिया

पंजाब/प्रतिनिधी

पंजाबचे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबमध्ये सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर त्यांच्याकडून आग्रही भूमिका घेतली गेल्याची आणि राजीनामा देणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, अखेर संध्याकाळी ४ वाजता अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत सहभागी न होताच त्यांनी राज्यपालांची भेट घेण्यासाठी ते पोहोचले. राज्यपालांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा सूपर्द केला आहे.

दरम्यान, आपल्या राजीनाम्यामागचं कारण स्पष्ट करताना त्यांनी म्हटलंय की, ज्या प्रकारे बोलणं झालं त्यावरून मला अपमानित झाल्यासारखं वाटलं आहे. आज सकाळी मी काँग्रेसच्या अध्यक्षांशी बोललो आहे आणि मी त्यांना सांगितलंय की आज मी राजीनामा देतो आहे. अलिकडच्या महिन्यांत आमदारांना भेटण्याची ही तिसरी वेळ आहे… म्हणूनच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Advertisements

Related Stories

काश्मीर : तीन दहशतवादी ठार

prashant_c

नेपाळ अन् श्रीलंकेतही भाजपचे सरकार येणार

Patil_p

तालिबानला पंजशीर ताब्यात घेण्यास मदत केली नाही, पाकिस्तानने दावा फेटाळला

Abhijeet Shinde

“शिवसेनेची हालत ‘या’ बॅनरसारखीच”

Abhijeet Shinde

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा ‘न्याय’

Patil_p

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या दीड कोटींवर

datta jadhav
error: Content is protected !!