तरुण भारत

भाजपकडून सोनोवाल, मुरुगन यांना उमेदवारी

राज्यसभा पोटनिवडणूक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

भाजपने शनिवारी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि एल. मुरुगन यांना राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी अनुक्रमे आसाम तसेच मध्यप्रदेशातून उमेदवारी घोषित केली आहे. दोन्ही नेत्यांना अलिकडेच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. या दोन्ही नेत्यांना 6 महिन्यांच्या आत संसदेचे सदस्यत्व मिळवावे लागणार आहे.

सोनोवाल आणि मुरुगन यांची राज्यसभेवर निवड होणे निश्चित आहे, कारण भाजपला दोन्ही राज्यांच्या विधानसभेत बहुमत प्राप्त आहे. आसाममध्दये विश्वजीत दैमारी यांनी राजीनामा दिल्यावर राज्यसभेची एक जागा रिक्त झाली होती. दैमारी आता विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत.

मध्यप्रदेशात तत्कालीन केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या राजीनाम्यानंतर वरिष्ठ सभागृहातील एक जागा रिक्त झाली आहे. गेहलोत यांना कर्नाटकचे राज्यपालपद मिळाले आहे.

Related Stories

पंतप्रधान मोदींकडून सेनेच्या सज्जतेची चाचपणी

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

Rohan_P

पंतप्रधान मोदींकडून डॉक्टर्सची प्रशंसा

Amit Kulkarni

पंजाबमध्ये कडक निर्बंध : नाईट कर्फ्यूची वेळ एका तासाने वाढवली!

Rohan_P

पूर्ण देशासाठी मिळणार ई-पास

Patil_p

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

Rohan_P
error: Content is protected !!