तरुण भारत

अमेरिका अन् ऑस्ट्रेलियाविरोधात फ्रान्सचे पाऊल

वृत्तसंस्था/ पॅरिस

अमेरिकेचा सर्वात जुना सहकारी फ्रान्सने आण्विक पाणबुडी करार रद्द करण्यात आल्याप्रकरणी अनपेक्षित संताप दाखवून देत अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधील स्वतःच्या राजदूताला परत बोलाविले आहे. 18 व्या शतकादरम्यान प्रस्थापित झालेल्या संबंधांदरम्यान अमेरिका आणि फ्रान्स यांच्यात आता दुरावा दिसून येत आहे.

Advertisements

हिंद-प्रशांत क्षेत्रात अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांच्या एका नव्या त्रिपक्षीय आघाडीच्या घोषणेनंतर हे संबंध बिघडले आहेत. आघाडीनंतर ऑस्ट्रेलियाने फ्रान्ससोबतचा 40 अब्ज डॉलर्सचा पाणबुडीचा करार रद्द केला आहे. ऑस्ट्रेलिया आता अमेरिकेकडून पाणबुडी विकत घेणार आहे.

अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाची घोषणा अत्यंत गंभीर आणि असाधारण आहे. याचमुळे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सुचनेनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. करार रद्द करणे सहकारी आणि भागीदारांदरम्यान अस्वीकारार्ह वर्तन असल्याचे फ्रान्सचे विदेशमंत्री जीन यवेस ले ड्रियान यांनी म्हटले आहे. करार रद्द करण्याची घोषणा युरोपसाठी हिंद-प्रशांतच्या महत्त्वाच्या आमच्या दृष्टीकोनाला थेट प्रभावित करत असल्याचे उद्गार राजदूत फिलिप एटियेन यांनी काढले आहेत.

बायडेन प्रशासन राजदूत परत बोलाविण्याच्या निर्णयासंबंधी पॅरिसच्या संपर्कात आहे. आम्ही फ्रान्सची स्थिती समजू शकतो आणि आगामी काळात या समस्येवर उपाय शोधण्यासाठी काम करत राहू. पुढील आठवडय़ात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेतही चर्चा करण्यात येईल असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले आहे. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करणार नाहीत. त्यांच्या जागी विदेश मंत्री ही जबाबदारी पार पाडणार आहेत.

Related Stories

फिनलंड पंतप्रधानांच्या महागडय़ा नाश्त्याची चर्चा

Amit Kulkarni

भारत-चीन वादावर मध्यस्थी करण्यास अमेरिका तयार

datta jadhav

‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत ३२६ भारतीय लंडनहून मायदेशी दाखल

triratna

पाकिस्तान : बेनजीर भुट्टो यांचा मुलगा बिलावल भुट्टो कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

दक्षिण कोरियाचे पाऊल

Patil_p

..अन् त्याने क्यूआर कोडचा टॅटूचं गोंदवला

Amit Kulkarni
error: Content is protected !!