तरुण भारत

येथे आला तो परतलाच नाही

अरुणाचल प्रदेशमध्ये गूढ सरोवर

तुम्ही कधी अशा सरोवराविषयी ऐकले आहे का जेथे कुणी जातो, तो परतून येत नाही. भारत आणि म्यानमारच्या सीमेनजीक एक असेच सरोवर आहे. याला ‘लेक ऑफ नो रिटर्न’ या नावाने ओळखले जाते. काही रहस्यमय घटनांमुळे हे सरोवर चर्चेचा विषय ठरते. या सरोवरानजकी जो गेला तो कधीच परतला नाही असे देखील म्हटले जाते.

Advertisements

अनेक कथा

या सरोवराच्या रहस्यावरून अनेक कथा समोर आल्या आहेत. याला नावांग यांग देखील म्हटले जाते आणि हे सरोवर अरुणाचल प्रदेशात आहे. दुसऱया महायुद्धादरम्यान अमेरिकेच्या वैमानिकांनी येथील भूमीला समतल मानून इमर्जन्सी लँडिंग करविले होते, पण त्यानंतर हे वैमानिक विमानांसह अत्यंत गूढ पद्धतीने बेपत्ता झाल्याचे मानले.

सैनिकही गायब

युद्ध संपल्यावर जपानी सैनिक मायदेशी परतत असताना ते देखील या सरोवरानजीक येऊन वाट चुकले आणि ते देखील गायब झाले. पण या सैनिकांचा हिवतापामुळे मृत्यू झाल्याचे काही जणांचे मानणे आहे.

आणखी एक कथा

परिसरातील ग्रामस्थ आणखीन एका कथेला या सरोवराच्या रहस्याशी जोडतात. अनेक वर्षांपूर्वी एका ग्रामस्थाने मोठा मासा पकडला होता, त्याने पूर्ण गावाला मेजवानीसाठी आमंत्रित केले होते. केवळ एक आजी आणि तिच्या नातीला बोलाविले नव्हते. यामुळे नाराज होत या सरोवराची देखरेख करणाऱया व्यक्तीने आजी आणि नातीला गावापासून दूर जाण्यास सांगितले. दुसऱयाच दिवशी पूर्ण गाव सरोवरात सामावल्याचे बोलले जाते. या सरोवराच्या रहस्याचा शोध लावण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण आतापर्यंतच अपयशच हाती लागले आहे.

Related Stories

तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका

Omkar B

धोका वाढला : दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या दीड लाख पार

Rohan_P

अमरनाथ यात्रेबाबत संभ्रम कायम

prashant_c

रेल्वेस्थानकांवर आता श्वानपथक

Patil_p

गुजरातने केलं, महाराष्ट्र केव्हा करणार ‘म्यूकोरमाइकोसिस’च्या वायल खरेदी?

datta jadhav

सणासुदीच्या काळात पश्चिम रेल्वेच्या 24 विशेष गाड्या धावणार

datta jadhav
error: Content is protected !!