तरुण भारत

‘काकुडा’चे सोनाक्षीने पूर्ण केले शूटिंग

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘काकुडा’मध्ये दिसणार आहे. रॉनी स्क्रूवाला यांच्या या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. सोनाक्षीसोबत या चित्रपटात रितेश देशमुख आणि साकिब सलीम आहेत. जुलैमध्ये याचे चित्रिकरण सुरू झाले होते. चित्रिकरण पूर्ण झाल्यावर सोनाक्षीने चित्रपटाच्या पूर्ण टीमसोबत छायाचित्र काढून घेत तो स्वतःच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

काकुडाचा प्रवास अत्यंत वेगळा होता, कोरोनाशी लढून, पावसावर मात करून, नाइटशिफ्टमध्ये काम करून हा चित्रपट पूर्ण झाला आहे, उत्तम अनुभवासाठी पूर्ण टीमचे आभार असे सोनाक्षीने या छायाचित्रासोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. 

Advertisements

काकुडाच्या माध्यमातून आदित्य सरपोतदार यांनी हिंदी चित्रपट दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. आदित्याला ‘क्लासमेट्स, ‘माऊली’ आणि ‘फास्टर फेने’ या मराठी चित्रपटांसाठी ओळखले जाते. काकुडा चित्रपट पुढील वर्षी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची पटकथा अविनाश द्विवेदी आणि चिराग गर्ग यांनी लिहिली आहे. तर याचे चित्रिकरण गुजरातमध्ये पार पडले आहे.

Related Stories

‘प्लॅनेट मराठी’चे अमृताच्या हस्ते अनावरण

Patil_p

चित्रपट अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे कर्करोगाने अमेरिकेत निधन

triratna

सेटवर तब्बूला झेडप्लस कोरोना कवच

Patil_p

तापसीचा ‘हसीन दिलरुबा’ नेटफ्लिक्सवर

Amit Kulkarni

‘खुफिया’मध्ये दिसणार तब्बू

Patil_p

मुंबई : इंटेरिअर डिझायनरवर अभिनेत्रीचा छेडछाडीचा आरोप, गुन्हा दाखल

Rohan_P
error: Content is protected !!