तरुण भारत

प्रियदर्शन यांची मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये

बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक उत्तम कॉमेडी चित्रपट देणारे दिग्दर्शक प्रियदर्शन यांची मुलगी कल्याणी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री आहे. पण कल्याण आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.  कल्याणीने तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. 28 वर्षीय कल्याणीने 2017 मध्ये तेलगू चित्रपट ‘हॅलो’द्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते.

कल्याणीने न्यूयॉर्क येथून आर्क्टिटेक्चर डिझायनिंगमधून पदवी मिळविलेली आहे. त्यानंतर तिने प्रॉडक्शन डिझायनिंगचे काम केले होते. 2013 मध्ये प्रदर्शित ‘कृष 3’ तसेच 2016 मधील ‘इरु मुगन’ या चित्रपटाकरता प्रॉडक्शन डिझाइन असिस्टंट म्हणून काम केले होते. प्रियदर्शन यांच्या चित्रपटातून कल्याणी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार नसल्याचे समोर आले आहे.

Advertisements

प्रियदर्शन यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील कॉमेडी किंग म्हटले जाते. प्रियदर्शन यांनी बॉलिवूडमध्ये हेराफेरी, ये तेरा घर ये मेरा घर, हंगामा, हलचल, गरम मसाला, भागम भाग, मालामाल विकली, चुप चुप के, ढोल, भूल भुलैरा, मेरे बाप पहले आप, दे दना दन, खट्टा मीठा आणि हंगामा 2 यासारखे धमाकेदार कॉमेडी चित्रपट दिले आहेत.

Related Stories

अभिनेत्री क्षिती जोग झाली निर्माती

Patil_p

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवर कोरोनाच्या निर्बंधांचं उल्लंघन केल्याचा आरोप; चौकशीचे आदेश

Rohan_P

मिथुन चक्रवर्तीच्या मुलासह पत्नीवर गुन्हा दाखल

Rohan_P

अभिनेता सोनू सूद ‘आयकर’च्या रडारवर

triratna

अनुरागच्या अडचणीत वाढ

triratna

बुडापेस्टमध्ये पोहोचली कंगना

Patil_p
error: Content is protected !!