तरुण भारत

श्रीक्षेत्र धर्मस्थळाकडून श्री गजानन ट्रस्टला 5 लाखांची देणगी

मंगल कार्यालय उभारणीस लावला हातभार

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

निलजी येथील श्री गजानन ट्रस्ट यांच्यावतीने बांधण्यात येत असलेल्या मंगल कार्यालयाला पाच लाख रुपये श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृध्दी यांच्यावतीने देण्यात  येणार आहेत. त्याबाबतचे प्रमाणपत्र ट्रस्टच्या मंडळाकडे धर्मस्थळाचे बेळगाव जिल्हा निर्देशक प्रदीप जी. यांनी दिले आहे.

यावेळी व्यासपीठावर अलौकिक ध्यानमंदिराचे गुरूजी चिदानंद, धर्मस्थळाचे मंजुनाथ, ट्रस्टचे अध्यक्ष गंगाराम मोदगेकर, बार असोसिएचे उपाध्यक्ष गजानन पाटील, ऍड. आर. जी. सोनेर आदी उपस्थित होते. यावेळी प्रदीप जी. यांनी गजानन ट्रस्टने जे काम सुरू केले आहे ते उल्लेखनिय आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी या ट्रस्टने प्रयत्न केले आहेत. या उल्लेखनिय कार्यामुळेच त्याची दखल श्रीक्षेत्र धर्मस्थळाने घेतली असून त्यांना पाच लाख रुपये देणगी दिल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी छत्रु पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. आजपर्यंत गजानन ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा आढावा ट्रस्टचे अध्यक्ष गंगाराम मोदगेकर यांनी घेतला. आपल्या या मंगल कार्यालयाला देणगी दिल्याबद्दल त्यांनी धर्मस्थळाचे आभारही व्यक्त केले.

या कार्यक्रमाला उपाध्यक्ष कल्लाप्पा गोविंद पाटील, सेपेटरी कृष्णा मोदगेकर, ग्राम पंचायत सदस्य रमेश मोदगेकर, मधू मोदगेकर, पल्लवी पाटील, वसंत पाटील, देवस्की पंच कमिटीचे सदस्य संजय पाटील, अनंत मोदगेकर, रवळू मोदगेकर, भूजंग पाटील याचबरोबर ग्रामस्थ रामा पाटील, वसंत पाटील, आप्पाजी अक्षीमनी, मिनल पाटील, मालु मोदगेकर आदी उपस्थित होते. ऍड. लक्ष्मण पाटील यांनी आभार मानले.

Related Stories

लोको पायलटच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

Amit Kulkarni

‘स्वच्छ-पारदर्शी’व्यवहारासाठी सर्वांचे सहकार्य हवे!

Omkar B

बिजगर्णीत शुक्रवारी भव्य कुस्ती मैदान

Amit Kulkarni

महाराष्ट्राने केंद्राकडे पाठपुरावा करावा

Amit Kulkarni

मतमोजणीसाठी साडेसातशे कर्मचाऱयांची कोरोना चाचणी

Amit Kulkarni

शिवप्रतिष्ठानतर्फे शिवाजी उद्यानात दीपोत्सव

Amit Kulkarni
error: Content is protected !!