तरुण भारत

साठे प्रबोधिनीच्या बोलीभाषा शब्दसंग्रह स्पर्धेचा निकाल जाहीर

बेळगाव  

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव यांच्यावतीने घेण्यात आलेल्या बोलीभाषा शब्दसंग्रह स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. मराठी विद्यानिकेतन  येथे दि. 17 रोजी झालेल्या बैठकीत हा निकाल जाहीर करण्यात आला.

Advertisements

प्रारंभी प्रबोधिनीतर्फे आयोजित अध्ययन-अध्यापन कार्यशाळा, गोष्टींची मज्जा कार्यशाळा व व्याकरण शुद्धीकरण कार्यशाळा यांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर यांनी बोलीभाषा शब्दसंग्रह स्पर्धेचा निकाल जाहीर केला.

या स्पर्धेमध्ये बेळगाव शहर, ग्रामीण, संकेश्वर, निपाणी, खानापूर येथून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास 40 बोलीभाषाप्रेमी स्पर्धकांनी बोलीभाषेतील शब्दसंग्रह पाठवून या स्पर्धेमध्ये भाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण बी. बी. शिंदे, डी. एस. मुतगेकर यांनी केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- प्रथम क्रमांक विजयालक्ष्मी देवगोजी, द्वितीय- स्मिता एन. पाटील, तृतीय- स्नेहल जोतिबा पाटील, विशेष निवड- कमल गजानन पाटील, स्वयंम राजू जोगाणी, सूरज हत्तलगी, रुपाली हळदणकर, प्राची नामदेव निंबाळकर, स्नेहा हिरोजी.

सर्व विजयी स्पर्धकांना प्रबोधिनीतर्फे आयोजित बालसाहित्य संमेलनामध्ये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

यावेळी प्रबोधिनीचे सचिव सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मालोजी अष्टेकर, सुरेश गडकरी, चिमणराव जाधव, बी. बी. शिंदे उपस्थित होते. प्रसाद सावंत यांनी आभार मानले.

Related Stories

बास्केटबॉल रिंगला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

Amit Kulkarni

रामदुर्ग तालुका ब्राह्मण समाजातर्फे करसेवकांचा सत्कार

Patil_p

त्या नराधमांना फाशी द्या

Patil_p

सोनं पावलांनी आली गौराई..!

Amit Kulkarni

सुळगा कार्यकारी संघातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

Amit Kulkarni

जुलै महिना ‘डेंग्यू प्रतिबंधक मास’

Amit Kulkarni
error: Content is protected !!