तरुण भारत

पूर्वभागात भात पीक पोसवणीस प्रारंभ

वार्ताहर/ सांबरा

तालुक्याच्या पूर्वभागातील बासुमती भात पिकाच्या पोसवणीस प्रारंभ झाला असून इतर भात पिकेही पोटरीला आली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisements

पूर्वभागातील बसवण कुडची, निलजी, मुतगा, सांबरा, बसरीकट्टी, शिंदोळी, बाळेकुंद्री खुर्द, होन्निहाळ, मोदगा आदी परिसरात काही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला होता हा पाऊस योग्यवेळी झाल्याने भातपिकाला अत्यंत लाभदायक ठरला आहे. सध्या बासुमती भात पोसवण्यास प्रारंभ झाला आहे. तर इतर भात पिकेही पोसवण्याच्या प्रक्रियेत आहेत. या भागात बऱयाच दिवसापासून पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे शिवारातील पाणी आटले होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पुन्हा शिवारात पाणी झाले आहे. त्यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे. सध्या भात पिकासह ऊस पिकही बहरात आले आहे. शिवारात भांगलणीची कामे जोरात सुरु आहेत.

Related Stories

हुबळी-एलटीटी रेल्वे 9 दिवसांसाठी रद्द

Patil_p

मालकांनी आपापली डुकरे त्वरित ताब्यात घ्या

Amit Kulkarni

सलग सुटय़ांमुळे शुक्रवारी बँकांमध्ये वर्दळ

Omkar B

शाश्वत सुखासाठी धार्मिक विधानांची गरज

Patil_p

हंगरगे गावात कडक लॉकडाऊनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

म. ए. युवा समिती आज शिक्षणाधिकाऱयांना निवेदन देणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!