तरुण भारत

केएलएस आयएमईआरचा स्थापना दिन साजरा

प्रतिनिधी/ बेळगाव

केएलएस आयएमईआरचा स्थापना दिन दि. 16 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून हिंडाल्को एचआर विभागाचे उपाध्यक्ष विश्वास शिंदे तर अध्यक्ष म्हणून कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आर. एस. मुतालिक उपस्थित होते.

Advertisements

प्रारंभी रावसाहेब गोगटे यांच्या प्रतिमेला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरवषी संस्था बेळगावच्या यशस्वी स्थानिक उद्योजकाची ओळख करुन त्यांचा सन्मान करते. यंदा पै बेकरीच्या व्यवस्थापकीय संचालक जोत्स्ना पै यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना देण्यात आलेल्या प्रशस्ती पत्राचे वाचन शैलजा हिरेमठ यांनी केले. यावेळी बोलताना जोत्स्ना पै यांनी कठोर परिश्रमाला पर्याय नाही असे सांगून सकारात्मक विचार ही यशाची गुरूकिल्ली आहे असे सांगितले.

विश्वास शिंदे यांनी उद्योजकतेचे महत्व अधोरेखीत केले. आर. एस. मुतालिक यांनी जोत्स्ना पैचे अभिनंदन करुन बेळगावातील महिलांच्या सक्षमीकरणाची प्रशंसा केली. आयएमईआरचे संचालक डॉ. अतुल देशपांडे यांनी स्वागत केले. सुत्रसंचालन डॉ. एस. जी. चिनीवार, संजय देशपांडे व प्रा. श्रीकांत नाईक यांनी केले.

Related Stories

नैऋत्य रेल्वे पुन्हा सुरू करणार 7 रेल्वे

Patil_p

श्री बसवेश्वर मल्टिपर्पज सौहार्दच्या चेअरमनवर कारवाई करा

Patil_p

खानापूर शिवप्रतिष्ठानतर्फे भीमगड किल्ल्यावर गडकोट मोहीम

Amit Kulkarni

मद्यविक्री दुकानात चोरीचे प्रकार वाढले

Patil_p

संगीता बांदेकर-कुलकर्णी यांच्या संमिश्र गायनाचा आज कार्यक्रम

Amit Kulkarni

खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदासाठी उद्या निवडणूक

Patil_p
error: Content is protected !!