तरुण भारत

राशिभविष्य

रवि. दि. 19  ते  25 सप्टेंबर 2021

मेष

Advertisements

या सप्ताहात तुळेत बुध प्रवेश, शुक्र, हर्षल प्रतियुती होत आहे. धंद्यात सप्ताहाच्या मध्यावर  समस्या येईल. कडवट, कठोर बोलणे टाळा. प्रकृतीची काळजी घ्या. उधारी वाढवू नका. व्यसनाने नुकसान होईल. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी वाढतील. तुमच्यावर वाट्टेल ते आरोप करण्याचा प्रयत्न होईल. स्पर्धा कठीण आहे.

वृषभ

या सप्ताहात तुळेत बुध प्रवेश. बुध, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात जम बसवा. मागील थकबाकी वसूल करा. कठीण वाटणारी सर्व कामे करून घ्या. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. संसारात महत्त्वाच्या निर्णयावर योग्य मार्ग शोधता येईल. नवीन ओळखी वाढतील. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने महत्त्वाची कामे करून घ्या. प्रति÷ा वाढेल.

मिथुन

या सप्ताहात तुळेत बुध प्रवेश, शुक्र, हर्षल प्रतियुती होत आहे. मैत्रीत गैरसमज होईल. विरुद्धलिंगी व्यक्तीवर जास्त भरवसा ठेवू नका. व्यसनाने मनस्ताप होईल. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक कार्यात आळसाने कामे रेंगाळतील. खाण्याचे तंत्र सांभाळा. संसारात नाराजी होईल. खर्च वाढेल. धंद्यात हुशारी वापरा.

कर्क

या सप्ताहात बुध, गुरु त्रिकोण योग, सूर्य, चंद्र प्रतियुती होत आहे. तुळेत बुध प्रवेश करीत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी संयमाने कृती करा. धंद्यात कामे वाढतील. लाभ होईल. शेअर्समध्ये फायदा होईल. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. राजकीय, सामाजिक कार्यात मान-प्रति÷ा मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. घरात आनंदी घटना घडेल.

सिंह

या सप्ताहात तुळेत बुध प्रवेश, शुक्र, हर्षल प्रतियुती होत आहे. धंद्यात वाढ होईल. भावना व व्यवहार यात गल्लत करू नका. मोहाला बळी पडू नका. संसारात खर्च वाढेल. नोकरीत वरि÷ांची कामे करण्यात यश मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे अंदाज चुकणार नाहीत याकडे लक्ष द्या. अहंमपणा ठेवू नका.

कन्या

या सप्ताहात तुळेत बुध प्रवेश. चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. धावपळ वाढेल. खंबीरपणे निर्णय घेता येईल. राजकारणात तुमच्या कामाचे कौतुक होईल. महत्त्वाची कामे लवकर करून घ्या. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. सामाजिक कामे वेगाने पूर्ण करा. घरात संयमाने वागा.

तुळ

या सप्ताहात तुळेत बुध प्रवेश, शुक्र, हर्षल प्रतियुती होत आहे. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. वाहनाचा वेग कमी ठेवा. कायदा सर्वत्र पाळा. नोकरीत तणाव होईल. कोणत्याही कामात चूक होणार नाही याकडे लक्ष ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात बोलण्यात सावध रहा. तुमच्यावर आरोप ठेवला जाईल. स्पर्धा कठीण आहे. घरात तणाव वाढवू नका.

वृश्चिक

या सप्ताहात तुळेत बुध प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात फायदा वाढेल. कामे वाढतील. गोड बोला. मोह आवरा. अनाठायी खर्च करावा लागेल. संसारात तडजोड करावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यातील कामे लवकर करून घ्या. समस्या सोडवा. व्यवहारात सावध रहा. स्पर्धा जिंकता येईल.

धनु

या सप्ताहात तुळेत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. धंद्यात चांगली सुधारणा करता येईल. मागील येणे वसूल करा. नवे कंत्राट मिळवा. नोकरीत तुमच्यावर वरि÷ खूष होतील. घरात आनंदी वातावरण राहील. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. सर्वांचे सहकार्य लाभेल. स्पर्धा जिंकाल.

मकर

या सप्ताहात तुळेत बुध प्रवेश, मंगळ, शनि त्रिकोणयोग होत आहे. तुमचा धंदा चांगला वाढेल प्रयत्न करा. वसुली करा. कोणताही प्रश्न सोडवण्याचा चांगला मार्ग शोधता येईल. नोकरीत प्रगती होईल. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने पुढे जाता येईल. दौऱयात यश मिळेल. कार्याची पद्धत ठरवून घ्या. स्पर्धेत जिंकाल. संसारात चांगला निर्णय घ्या.

कुंभ

या सप्ताहात तुळेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र षडाष्टकयोग होत आहे. उत्साह वाढेल. संयम मात्र सोडू नका. कायदा मोडू नका. धंद्यात वस्तू, पैसे सांभाळा. नोकरी टिकवा, साडेसाती चालू आहे. अतिरेक करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात कठोर बोलणे टाळा. नकळत कोणतीही चूक होणार नाही, याकडे लक्ष ठेवा. स्पर्धा नको. प्रकृती सांभाळा.

मीन

या सप्ताहात तुळेत बुध प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ होईल. लक्षपूर्वक निर्णय घ्या. समस्या सोडवा. संसारात वाद वाढवू नका. प्रकृती सांभाळा. नोकरीत वर्चस्व वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात बुद्धीचातुर्य दाखवा. पद स्थिर करा. स्पर्धेत प्रगती कराल. जमीन, घरासंबंधी समस्या लवकर सोडवा.

Related Stories

आजचे भविष्य गुरुवार दि. 14 मे 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 16 मार्च 2021

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 22 डिसेंबर 2020

Patil_p

आजचे भविष्य बुधवार दि. 19 ऑगस्ट 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 21 जानेवारी 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 10 ऑगस्ट 2021

Patil_p
error: Content is protected !!