तरुण भारत

जम्मू काश्मीरमध्ये 4.3 तीव्रतेचा भूकंप

श्रीनगर

 जम्मू काश्मीरच्या अनेक भागात शनिवारी सकाळच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे घबराट पसरली. सकाळी 10.14 वाजण्याच्या सुमारास सर्वप्रथम धक्के जाणवल्यानंतर अनेक लोक घर-कार्यालयांमधून मोकळय़ा मैदानात बाहेर पडल्याचे दिसून येत होते. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानच्या क्षेत्रात असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, तेथेही जीवितहानी झालेली नाही. मागील महिन्यातही या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Advertisements

Related Stories

कोरोनाबाधितांची संख्या 23 हजारावर

Patil_p

अयोध्या : राम मंदिराच्या पायाभरणीस प्रारंभ

datta jadhav

उध्दव ठाकरेंनंतर आता आदित्य ठाकरेंशी राहुल गांधींनी केली चर्चा; मुंबईतील कोरोना रोखण्यासाठी दिला ‘हा’ सल्ला

Rohan_P

गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य 2 किमी मागे हटले

datta jadhav

शरद पवारांचे मोदींना पत्र; साखर उद्योग वाचवण्यासाठी केली भरीव निधीची मागणी

datta jadhav

देशात 49 लाख लोकांना लसीकरण

datta jadhav
error: Content is protected !!