तरुण भारत

वर्षाच्या सुरुवातीला लहान मुलांसाठी लस

आदर पूनावाला यांची माहिती

पुणे / प्रतिनिधी

Advertisements

 पुढील वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी-फेब्रुवारी 2022 मध्ये लहान मुलांसाठी लस देण्यात येणार असल्याची माहिती सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी येथे दिली.

 याबाबत बोलताना पूनावाला म्हणाले, अनेक स्वयंसेवकांना तपासण्यांसाठी लसीचे डोस देण्यात आले आहेत. चाचण्या व्यवस्थित सुरू आहेत. या वर्षाअखेरीसपर्यंत या चाचण्यांचा आढावा घेतला जाईल. सर्व चाचण्या आणि प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्या, तर वर्षाच्या सुरुवातीला लस देण्यात येईल. गेल्या वषी अमेरिकी लसनिर्मिती कंपनी असलेल्या नोवोवॅक्सने आपल्या लसीच्या उत्पादनासंदर्भात सीरम इन्स्टिटय़ूटसोबत करार केला आहे. यासाठी देशभरातील एकूण 10 ठिकाणांहून 920 स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी 2 ठिकाणे पुण्यातली आहेत. तपासण्यांसाठी आम्हाला किमान 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागेल. आम्ही टप्प्याटप्प्याने यावर काम करत आहोत.

 12 वर्षांच्या खालील मुलांचादेखील चाचण्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. सर्व पालकांना त्यांची मुले सुरक्षित हवी आहेत. लसीला पुढील वषी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत मंजुरी मिळालेली असेल, याचा विश्वास वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Related Stories

तिसऱ्या उद्रेकासंबंधी अनेक गैरसमज

Amit Kulkarni

एक महिन्यात बंगला खाली करा; प्रियांका गांधींना मोदी सरकारची नोटीस

Rohan_P

कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका – राहुल गांधी

Patil_p

यूपीएससीचा निकाल जाहीर; प्रदीप सिंह देशात अव्वल

Rohan_P

भारतातून 50 लाख टन साखरेच्या निर्यातीचा मार्ग खुला

Patil_p

इतरांकडून प्रमाणपत्राची गरज नाही !

Patil_p
error: Content is protected !!