तरुण भारत

मुंबईत संशयित दहशतवादी ताब्यात

राज्य एटीएसची जोगेश्वरी येथे कारवाई, ‘मॉडय़ूल’मधील आणखी एक संशयितही जाळय़ात

मुंबई, कोलकाता / वृत्तसंस्था

Advertisements

देशातील दहशतवादी मॉडय़ूल उघडकीस आल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या हाती आणखी दोघे संशयित सापडले आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने देशातून सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर राज्य एटीएसने घातपाती कारवायांच्या तयारीत असल्याच्या संशयावरून मुंबईतील जोगेश्वरी येथून एका संशयिताला शनिवारी अटक केली. आरोपी पाकिस्तानातील एका व्यक्तींच्या संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय असून, याचा अधिक तपास सुरू असल्याचे एटीएसच्या अधिकाऱयाने सांगितले. याप्रकरणी आरोपीला दोन दिवसांची कोठडी न्यायालयाने दिली आहे.

जाकीर शेख असे संशयित आरोपीचे नाव असून तो जोगेश्वरी येथील रहिवासी आहे. तो पाकिस्तानातील ऍन्थोनीच्या संपर्कात होता. ऍन्थोनी हे पाकिस्तानातील व्यक्तीचे सांकेतिक नाव असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी एटीएसने वेगळा गुन्हा दाखल केला असून शेखला अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एटीएस शेखवर पाळत ठेऊन होते. त्याच्यासोबत दिल्ली पोलिसांनी अटक केलेला समीर कालिया ऊर्फ जान मोहम्मद हाही एटीएसच्या रडावर होता. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या संशयीत दहशतवाद्यांच्या चौकशीतही शेखचे नाव समजले होते.

शेखला शुक्रवारी रात्री ताब्यात घेण्यात आल्यानंतर एटीएसच्या नागपाडा येथील कार्यालयात आणून त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. याप्रकरणी एटीएसने यूएपीए कायद्याच्या कलम 18 अंतर्गत वेगळा गुन्हा दाखल केल्यामुळे आता आरोपी शेखचा ताबा दिल्ली पोलिसांना देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रयागराजमध्ये एकाची शरणागती

कोलकाता ः हुमैद उर रेहमान नामक संशयिताने पश्चिम बंगालमधील करेली पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली असून त्याची युद्धपातळीवर चौकशी सुरू आहे. सदर संशयित यापूर्वी दिल्लीत अटक करण्यात आलेल्या ओसामाचा काका आहे.  दिल्ली पोलीस हुमैद उर रेहमानचा शोध घेत होते. ओसामाचे वडील दुबईत आयएसआयचे हँडलर आहेत. हुमैद हा दुबईत बसलेल्या आपल्या भावाच्या सांगण्यावरून भारतातील मिशन हँडल करत होता. सध्या करेली पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरु आहे.

Related Stories

ड्रोनच्या वापरासाठीचे नियम शिथिल

Amit Kulkarni

छत्तीसगढ : नक्षलवाद्यांनी आईईडी स्फोटकांनी उडवली बस; 3 जवान शहीद

datta jadhav

घरपोच सिलिंडरसाठी आता ‘ओटीपी’ अत्यावश्यक

Patil_p

काँग्रेसचे वरिष्ठ नेते माधव सिंह सोलंकी यांचे निधन

Rohan_P

आंध्रप्रदेशमध्ये भीषण दुर्घटना, 14 जणांचा मृत्यू

Patil_p

85 हजार रुपये किलोची भाजी!

Patil_p
error: Content is protected !!