तरुण भारत

डेव्हिस लढतीत फिनलंडची भारतावर मात

वृत्तसंस्था/ इस्पो

येथे सुरू असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या विश्व गट-1 मधील लढतीत शुक्रवारी यजमान फिनलंडने सलामीचे दोन्ही एकेरी सामने व दुहेरीतील निर्णायक सामना जिंकून भारतावर 3-0 अशी एकतर्फी मात केली. भारताचा प्रज्ञेश गुणेश्वरन आणि रामकुमार रामनाथन यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा-रामकुमार रामनाथन यांचाही धुव्वा उडाला.

Advertisements

शुक्रवारी झालेल्या पहिल्या एकेरी सामन्यात एटीपीच्या मानांकनात 419 व्या स्थानावर असलेल्या फिनलँडच्या ओटो व्हर्टनेनने भारताच्या प्रज्ञेश गुणेश्वरनचा 6-3, 7-6 (7-1) अशा सेट्समध्ये पराभव केला. हा सामना 85 मिनिटे चालला होता. पहिल्या सेट्समध्ये सहाव्या गेममध्ये प्रज्ञेशने आपली सर्व्हिस गमावली. व्हर्टनेनने या सेट्समधील नववा आणि शेवटचा गेम आपल्या सर्व्हिसवर जिंकून प्रजनीशवर एका सेटची आघाडी मिळविली. या लढतीतील दुसरा सेट चुरशीचा झाला. टायब्ा्रsकरपर्यंत लांबलेल्या या सेटमध्ये व्हर्टनेनने आपल्या अचूक सर्व्हिसवर तसेच बेसलाईन खेळाच्या जोरावर प्रज्ञेशचे आव्हान संपुष्टात आणले.

दुसऱया एकेरीच्या सामन्यात एटीपीच्या मानांकनात 74 व्या स्थानावरील फिनलँडच्या टॉप सीडेड इमिल रूसुव्होरीने रामकुमार रामनाथनचा 6-4, 7-5 असा पराभव करत आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. या सामन्यामध्ये रामनाथनकडून क्रॉस फटक्यावर अधिक गुण गमविले. रामनाथनला आपली सर्व्हिस अधिक वेळ राखता आली नाही. रूसुव्होरीने वेगवान सर्व्हिस तसेच फोरहँड फटक्याच्या जोरावर विजय मिळविला. त्यानंतर पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा व रामकुमार रामनाथन यांना हेन्री कोन्टिनेन व हॅरी हेलिओव्हरा यांच्याकडून 7-6 (2), 7-6 (2) असा सरळ सेट्समध्ये पराभवाचा धक्का सोसावा लागला.

Related Stories

भारतीय महिला हॉकी संघाचा चिली वरिष्ठ संघावर विजय

Amit Kulkarni

गिलच्या द्विशतकाने भारत अ संघाची कसोटी अनिर्णित

Patil_p

मुष्टीयुद्ध स्पर्धेत सतीशकुमार अंतिम फेरीत

Patil_p

सलग 3 ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारी लॉरा पहिली ब्रिटीश महिला

Patil_p

आर्थिक-मानसिक परिस्थितीवर परिणाम होण्याची भीती : एचएस प्रणॉय

Patil_p

स्थानिक क्रिकेटमध्ये श्रीशांतचे पुनरागमन होणार

Patil_p
error: Content is protected !!