तरुण भारत

रवी नाईक यांची लोकप्रियता कायम

मुख्यमंत्र्याकडून वाढदिनाच्या शुभेच्छा.

फोंडा / प्रतिनिधी

Advertisements

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी फोंडय़चे आमदार व माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रवी नाईक हे गोव्याच्या राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व असून त्यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. कुळ मुंडकरांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेला लढा अविस्मरणीय असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना दिली. रवी नाईक यांनी यापुढेही राजकारणात सक्रिय राहावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी काल शनिवारी रात्री आठ वाजता आमदार रवी नाईक यांच्या खडपाबंध येथील कार्यालयात भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रवी नाईक यांचे पुत्र नगरसेवक रितेश नाईक, रॉय नाईक, फोंडा भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ दळवी, नगरसेवक आनंद नाईक, गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी भाजपाचे संघटन मंत्री सतीश धोंड, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, प्रदेश सरचिटणीस एडवोकेट नरेंद्र सावईकर, दामू नाईक, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रवी नाईक यांना शुभेच्छा दिल्या. रवी नाईक हे काँग्रेसचे ज्ये÷ नेते असले तरीही काँग्रेसमधील एकही आमदार व पदाधिकाऱयांनी उपस्थिती लावली नाही. फोंडा व गोव्याच्या अन्य भागातील असंख्य चाहत्यांनी रवी नाईक यांच्यावर शुभेच्छा?चा वर्षाव केला.

Related Stories

पणजी मनपा, बहुतांश पालिकांचे कर्मचारी मार्चच्या वेतनाच्या प्रतीक्षेत

Omkar B

भूमिपुत्र अधिकारिता विधेयकातून आक्षेपार्ह ‘भूमिपुत्र’ शब्द हटवा

Amit Kulkarni

मगोपचे 18 उमेदवार निश्चित

Omkar B

दिल्लीत देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ

Amit Kulkarni

साळगाव मतदारसंघतील निवृत्त शिक्षकांचा सत्कार

Amit Kulkarni

पणजी मनपाचा अर्थसंकल्प आज

tarunbharat
error: Content is protected !!