तरुण भारत

फोंडय़ातील नायर यांच्या दुकानात चोरी

मौल्यवाननाणीवनोटांसह 6 लाखांचाऐवजलंपास

प्रतिनिधी/ फोंडा

Advertisements

विविध राष्ट्रांच्या नोटा व मौल्यवान नाणी, तसेच जुन्या फाटक्या नोटा बदलून देणारे  फोंडय़ातील सर्वात जुने व वयस्क व्यापारी के. गोपालन नायर यांचे दुकान फोडून चोरटय़ांनी साधारण रु. 5 ते 6 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. गेल्या 7 सप्टेंबर रोजी रात्री ही चोरी झाली होती. नायर यांनी फोंडा पोलिसांत तक्रार देऊन दहा दिवस उलटले तरी अद्याप या चोरीचा छडा लागलेला नाही.

चोरटय़ांनी नायर यांच्या दुकानातील विविध देशातील मौल्यवान नाणी, सध्या चलनात नसलेली जुनी नाणी, डॉलर, युरो, रुबलसह अन्य विविध राष्ट्रातील चलनी नोटा पळविल्या. सध्या चलनात असलेल्या दहा व वीस रुपयांच्या नोटांची काही बंडलेही गायब केली आहेत. ज्यांची किंमत रु. 50 हजारापर्यंत असल्याचे तक्रारदार नायर यांचे म्हणणे आहे. रु. 2 लाख किंमत असलेल्या बर्थडे नोटांची दोन बंडलेही लंपास करण्यात आली आहेत. याशिवाय काही फाटक्या नोटा व नाणीही गायब करण्यात आली आहे. नायर यांच्या दुकानात विविध देशातील जुन्या नाण्यांबरोबरच पोर्तुगीज कालीन नाणीही होती. चलनात नसलेली बरीच नाणी त्यांच्याकडे असून धार्मिक कार्यासाठी ती विकत घेणारा त्यांचा खास ग्राहक आहे. बर्थडे नोटा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेचा आकडा असलेल्या नोटा ते विक्रीसाठी ठेवतात. एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाला शुभेच्छा संदेश देण्यासाठी या नोटा विकत घेण्यासाठी लोक त्यांच्या दुकानात येतात. लकी नंबर असलेल्या नोटाही जास्त दराने त्यांच्याकडून ग्राहक विकत घेतात. अशा बऱयाच नोटा व नाणी चोरटय़ांनी लंपास केल्याचे नायर यांचे म्हणणे आहे.

नायर हे 82 वर्षांचे असून गेल्या 60 वर्षांपासून फोंडा बाजारात हा व्यावसाय करीत आहेत. वरचा बाजार येथे भाजी मार्केट जवळील शेडमध्ये त्यांचे हे दुकान आहे. 7 सप्टें. रोजी चोरटय़ांनी दुकानाची एक फळी काढून आंतमध्ये प्रवेश केला व रोख रकमेसह तेथील मौल्यवान ऐवज पळविला. दुसऱया दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी फोंडा नगरपालिका व फोंडा पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून या चोरीचा तपास लावण्यात अद्याप यश आलेले नाही.

Related Stories

ऑक्टोबरमध्ये पाच दिवसांचे अधिवेशन घ्यावे

Patil_p

मडगाव पालिकेच्या प्रभाग 25 मध्ये डेंग्यू, मलेरियासंदर्भात जनजागृती

Amit Kulkarni

गौरव आर्य आज ‘इडी’समोर हजर राहणार

Patil_p

म्हापसा पार्किंग प्रश्नी विरोधक आक्रमक

Amit Kulkarni

पेडणे तालुका उपजिल्हाधिकाऱयांशी विर्नोडा पंचायत मंडळाची चर्चा

Omkar B

संजीवनी बंद केल्यास हजारो कुटुंबांवर उपासमारीची पाळी

Patil_p
error: Content is protected !!