तरुण भारत

वार्का येथील कॅसिनोवर धाड

प्रतिनिधी/ मडगाव

शनिवारी पहाटे दक्षिण गोव्यातील वार्का येथील ‘सी ब्रिज’ नावाच्या हॉटेलवर पोलिसांनी धाड घातली आणि तेथे चालू असलेल्या बेकायदेशीररित्या कॅसिनोत खेळणाऱया 15 संशयित आरोपींना अटक केली. या धाडीत रोख 6,90,000 रुपये जप्त करण्यात आली. अटक केलेले गुजरात व गोवा राज्यातील आहेत.

Advertisements

 या हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या कॅसिनो चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोलवा पोलिसांनी या माहितीची खात्री केली. धाड घालताना मुबलक साहाय्यक असावेत या हेतूने कोलवा पोलिसांनी मडगाव पोलिसांचे साहाय्य घेतले आणि शनिवारी पहाटे सर्वसाधारण जनता गाढ झोपेत असतानाच्या वेळेत म्हणजे 3 वाजण्याच्या सुमाराला ही धाड घातली.

अकस्मात घटनास्थळी पोलीस पाहून वरील हॉटेलातील कर्मचारी गोंधळले आणि पोलिसांनी बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या आणि तेथील कॅसिनोत खेळत असलेल्या 15 संशयित आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेले संशयित आरोपी हे गुजरात आणि गोव्यातील संशयित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी तेथील सामान जप्त केले. त्यात रोख 6.90 लाख रुपये, पत्ते यासारखी सामुग्री जप्त केली.

पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग, मडगाव पोलीस विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण, मडगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दितेंद्र नाईक, उपनिरीक्षक अजीत वेळीप, उपनिरीक्षक राहूल नाईक, साहाय्यक उपनिरीक्षक दिलखुष वेळीप, पोलीस शिपाई विकास कौशीक, केशव, अमर गावकर, हेमंत भंडारी, सुशांत, गोरखनाथ, कल्पेश खोलकर, ओर्लाद, विशाल प्रभू, साईश मांद्रेकर, स्वप्नेश वेळीप, विरेंद्र गावकर, सुहास साळकर, वासिम शेख, सुभानी शेख व हर्षद गावडे यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

Related Stories

मान्सूनचा आज अखेरचा दिवस

Amit Kulkarni

कवळे ग्रामसभेत कचरा व्यवस्थापनावर चर्चा

Patil_p

ब्रम्हकरमळीतील नागरिकांना जुलाब, उलटय़ा

Amit Kulkarni

अर्थसंकल्प विभागाचे माजी संयुक्त सचिव आनंद शेरखाने यांचे निधन

Amit Kulkarni

बेकायदा नोकरभरतीची चौकशी करावी

Omkar B

विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसिकरण करुन परीक्षा घ्या !

Amit Kulkarni
error: Content is protected !!