तरुण भारत

मुख्यमंत्री बदलण्याचा विचार नाही- सदानंद तानावडे

मुख्यमंत्री बदलण्याचा विचार नाही- सदानंद तानावडे

प्रतिनिधी/ म्हापसा

Advertisements

गुजरात, कर्नाटकसह चार भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्री बदलले असले तरी गोव्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बदलण्याचा भाजपचा विचारच नाही. असे स्पष्ट करून येत्या निवडणुकीसाठी डॉ. प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश भाजपतर्फे 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबपर्यंत राज्यभर आयोजित ‘सेवा और समर्पण’ अभियानाचे आयोजन केले असून त्या अंतर्गत शुक्रवारी म्हापसा येथील उत्तर गोवा भाजप कार्यालयात मोदी यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱया प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा, नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर मांद्रेकर, बस्तोडा सरपंच रणजीत उसगावकर, म्हापसा भाजप मंडळ अध्यक्ष सुशांत हरमलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तानावडे म्हणाले की, डॉ. प्रमोद सावंत हेच भाजपचा मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा असेल असे जे.पी. नड्डा यांनी जाहीर केले आहे. तानावडे पुढे म्हणाले की, भाजपच्या नियमित प्रक्रियेनुसारच प्रत्येक निवडणुकीवेळी मंडळ समितीमार्फत उमेदवाराची निवड होते व केंद्रीय समिती त्याबाबत शिक्कामोर्तब करते. त्यामुळे उमेदवारांबाबत योग्य वेळी केंद्रीय स्तरावरून निर्णय घेतला जाईल. काही मतदारसंघात भाजपचे दोन तीन इच्छुक उमेदवार असल्याने त्याबाबत काय निर्णय घेतला जाईल असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता त्याबाबत भाष्य करणे त्यांनी टाळले.

Related Stories

मुख्यमंत्र्यांकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Patil_p

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Omkar B

नोकर भरतीवरील बंदी उठवली

Amit Kulkarni

नेसाय येथे आज रेल्वेमार्गाच्या सीमांकनाच्या विरोधात निदर्शने

Omkar B

तब्बल दहा गोलांच्या सामन्यांत ओडिशाची ईस्ट बंगालवर 6-4 अशी मात

Amit Kulkarni

जनतेने राजकीय महामारीतून राज्याला मुक्त करावे

Amit Kulkarni
error: Content is protected !!