तरुण भारत

गोव्याने मिळविलेले यश जगासाठी प्रेरणादायी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार, गोमंतकीयांशी साधला व्हर्च्युअलपद्धतीने संवाद

प्रतिनिधी/ पणजी

Advertisements

राज्यातील सर्व पात्र नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट 100 टक्के साध्य करून गोव्याने मिळविलेले यश हे संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी कार्य आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. या मोहिमेच्या यशस्वीतेत सहभागी सर्व आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले.

पहिल्या डोसचे 100 टक्के पूर्तता उद्दिष्टय़ साध्य केल्याबद्दल व्हर्च्युअल पद्धतीने गोमंतकीयांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी बोलत होते. गोमेकॉचा मुख्य व्याख्यान सभागृह, मडगाव रवींद्र भवन, सांगे नगरपालिका सभागृह, फोंडा राजीव कला मंदीर, सांखळी नगरपालिका सभागृह, म्हापसा जुने ऑझिलो इस्पितळ सभागृह येथे हा कार्यक्रम थेट पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. भारती पवार, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, बाबू कवळेकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मंत्री जेनिफर मोन्सेरात, मुख्य सचिव परिमल राय, यांच्यासह आरोग्य खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्याशिवाय राज्याच्या विविध भागातील केंद्रांवरून आमदार, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य, पंचायत सदस्य व अन्य नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

पुढे बोलताना पंतप्रधानांनी अतिवृष्टी, चक्रीवादळ, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या काळातही लसीकरणाचा वेग कायम ठेऊन राज्यातील प्रत्येक नागरिकाला लसीचा किमान एक डोस दिल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला व सर्व आरोग्य कर्मचारी आणि इतर चमूचे कौतूक केले. ‘कोरोनाविरुद्धच्या लढाईतील हे एक मोठे यश आहे’, असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकर्तृत्वाचेही त्यांनी स्मरण केले.

सामाजिक आणि भौगोलिक आव्हानांचा सामना करत गोव्याने ज्या प्रकारचा समतोल साधला आहे, त्याचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली. राज्याच्या अत्यंत दुर्गम भागातही लसीकरणाचा वेग तेवढाच होता, हे अन्य सर्व राज्यांसाठी आदर्श उदाहरण ठरावे, असे पंतप्रधान म्हणाले. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मंत्राची परिणामकारक अंमलबजावणी गोव्यात होतांना दिसते आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या दोन वर्षांपासून स्वतःच्या जीवाचीसुद्धा पर्वा न करता लोकसेवेत गुंतलेल्या खास करून वैद्यकीय क्षेत्रातील लोकांप्रति पंतप्रधानांनी आदर व्यक्त केला.  गोव्यासह हिमाचल प्रदेश, चंडीगढ आणि लक्षद्वीप येथे लसीचा पहिली डोस देण्याचे उद्दिष्ट 100 टक्के साध्य झाले असून सिक्कीम, अंदमान निकोबार, केरळ, लडाख, उत्तराखंड, दादरा-नगर हवेली येथेही हे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.

गोवा हा ब्रँड इंडियाचा आश्वासक चेहरा

केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्याने, गोवा पर्यटन क्षेत्राला अधिकाधिक गतिमान करण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकरी आणि  मच्छीमारांना अधिक सुविधाही मिळत आहेत. मोपा ग्रीनफील्ड विमानतळ आणि सहा पदरी महामार्ग यासाठी 12 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोविड काळातही गरिबांना अन्नधान्य, मोफत गॅस सिलेंडर, किसान सन्मान निधी, यासारख्या अनेक योजना आणि उपक्रमांची झालेली प्रभावी अंमलबजावणी कौतुकास्पद आहे, असे सांगून, गोवा हे केवळ देशातील एक राज्य नव्हे तर ब्रँड इंडियाचा एक आश्वासक चेहरा आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

कोविडयोद्धांशी साधला संवाद  

पंतप्रधानांनी सर्वप्रथम गोमेकॉतील व्याख्याते डॉ. नितीन धूपदाळे यांच्याशी संवाद साधला. लस घेण्यासाठी लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी डॉ. धूपदाळे यांचे कौतूक केले. सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी नझीर शेख यांच्याकडून त्यांनी लोकांना कशाप्रकारे लसीकरणासाठी प्रवृत्त केले त्याची माहिती जाणून घेतली.

कोरोनायोद्धय़ा स्वीमा फर्नांडिस यांच्याशी संवाद साधताना, लसी वाया जाऊ नयेत म्हणून कोणती पावले उचलली जातात त्यासंबंधी जाणून घेतले. स्वतःच्या कुटुंबियांची जबाबदारी असतानाही त्या बजावत असलेल्या कर्तव्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

पुढील 25 वर्षांवर लक्ष केंद्रीत करा

निवृत्त विक्रीकर अधिकारी असलेले 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक शशिकांत भगत यांच्याशी संवाद साधताना, पंतप्रधानांनी त्यांना 75 वर्षांचा विचार करू नका, तर पुढील 25 वर्षांवर लक्ष केंद्रीत करा, असा सल्ला दिला. तसेच भगत यांच्या सामाजिक सेवेबद्दल कौतुक केले. त्यावेळी बोलताना भगत यांनी ज्ये÷ नागरिकांना दिलेल्या प्राथमिकतेबद्दल समाधान व्यक्त केले.

दुर्गम भागात टिमका उत्सव कसा आयोजित करण्यात पुढाकार घेतलेल्या स्वीटी वेंगुर्लेकर यांच्याकडून पंतप्रधानांनी उत्सवाच्या आयोजनाबद्दल माहिती जाणून घेतली. महामारीच्या काळात नागरिकांसाठी शक्मय तितके व्यवहार सोपे व्हावेत यावर आपण लक्ष केंद्रीत केले असे त्यांनी सांगितले.

शैक्षणिक यशाबद्दल कौतुक

दिव्यांग लाभार्थी सुमेरा खान यांच्याकडून पंतप्रधानांनी लसीकरणाचे अनुभव जाणून घेतले. तसेच श्रीमती खान यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील यशाबद्दल कौतुक केले आणि त्यांच्या आयएएस अधिकारी होण्याच्या आकांक्षांसाठी शुभेच्छा दिल्या.  

31 ऑक्टोबरपर्यंत दुसऱया डोसच्या उद्दिष्टपूर्तीचे ध्येय ः मुख्यमंत्री

प्रारंभी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधानांसह अन्य उपस्थितांचे स्वागत केले. पंतप्रधानांच्या सहकार्यामुळेच गोवा आपले 100 टक्क्यांचे उद्दिष्ट पूर्ण करू शकला. या प्रक्रियेत एक सुद्धा लस वाया घालविण्यात आली नाही. लसीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या कायमस्वरुपी केंद्रांच्या जोडीनेच टिका उत्सवांच्या माध्यमातून गावोगावी शिबिरांचे आयोजन करून अधिकाधिक लोकांना लस देण्यात आली. त्याकामी आरोग्य, शिक्षण, आदी अनेक खात्यातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, फिल्ड ऑफिसर, गावोगावीचे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, आदींचे बहुमूल्य सहकार्य मिळाले. आता यापुढे अधिक गतीने लसीकरण करून दुसऱया डोसचेही 100 टक्के उद्दिष्ट 31 ऑक्टोबरपर्यंत साध्य करण्यात येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. गोव्यासाठी अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभारही व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांचे कार्य कौतुकास्पद ः मोदी

सच्चे कर्मयोगी स्व. मनोहर पर्रीकर यांची चौफेर विकासाची परंपरा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही कायम ठेवली आहे. त्याशिवाय आत्मनिर्भर भारतच्या धर्तीवर स्वयंपूर्ण गोवा बनविण्यासाठीही ते झटत आहेत. यावरून गोवा सर्व क्षेत्रात आघाडीवर असल्याचे सिद्ध होत आहे, अशा शब्दात पंतप्रधान श्री. मोदी यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. आपले मित्र तथा आधुनिक गोव्याचे शिल्पकार मनोहर पर्रीकर आज असते तर त्यांची छाती अभिमानाने भरून आली असती, असेही मोदी पुढे म्हणाले.

Related Stories

साळगावकरांनी कचरा प्रकल्प विस्तारीकरणाविरोधातील पत्र दाखवावे

Patil_p

आंतराष्ट्रीय आदिवासी दिन बोरीत साजरा

Omkar B

ताळगावात शेतकऱयांना मोफत भातकापणी यंत्र

Amit Kulkarni

सत्तरी तालुक्मयात पारंपरिक गौरी पूजनाचा कार्यक्रम उत्साहात

Patil_p

ग्रामीण भागातही निर्माण झाली कचरा समस्या

Omkar B

पेडणे तालुक्यात झाडांची पडझड

Patil_p
error: Content is protected !!