तरुण भारत

शहरी भागात होणार वॉर्डनिहाय लसीकरण

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिह्यात लसीकरण प्रभावीपणे राबवण्यासाठी जिह्यात शहरी आणि निमशहरी भागात वॉर्डनिहाय लसीकरण करण्यासाठी नियोजन करावे, अशा सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांना दिल्या आहे.  

Advertisements

मुख्य कार्यकारी  अधिकारी विनय गौडा यांनी दिलेल्या आदेशानुसार लसीकरण जिह्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी शहरी आणि निमशहरी भागातील  नागरिकांसाठी त्या भागातील नगरपालिका व नगरपरिषदेकडून कार्यवाही होणे अपेक्षित आहे. त्याच अनुषंगाने नगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील कोव्हिड लस देय लाभार्थींची वॉर्डनिहाय यादी तयार करण्यात यावी, कोव्हीड लस देय लाभार्थींचे लसीकरणाचे वार्डनिहाय कृतिनियोजन तालुका आरोग्यअधिकारी यांच्यासोबत करावे, केले कृती नियोजन सादर करावे, कार्यक्षेत्रात घेण्यात आलेल्या लसीकरण सत्रासाठी ठिकाणांचे लसीकरणाचे  सादर करावे, कार्यक्षेत्रामध्ये घेण्यात येणाऱया लसीकरण सत्रासाठी ठिकाणचे नियोजन करणे्, त्या ठिकाणी व्हेरिफायर, ऑपरेटर व इतर आवश्यक मुष्यमबळ देवून लसीकरणाचे कामकाज वाढवणे, वॉर्डनिहाय लसीकरण केंद्रावर स्वयंसेवकांची नेमणूक व कोविड लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात यावी, कोविड लसीकरण पेंद्राबाबत व मोहिमेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती देण्यात यावी, तर आरोग्य विभागाकडून लसीकरण सत्राच्या ठिकाणी लसीकरण टिमचे नियोजन करणे, त्यात डॉक्टर, व्हॅक्सीनेटर यांचा समावेश असावा, आवश्यकतेनुसार ग्रामीण कार्यक्षेत्रातील व्हॅक्सीनेटर लसीकरणासाठी उपलब्ध करुन देण्यात यावेत, लसीकरणासाठी आवश्यक लसीची मागणी करावी, अशा त्यांनी सुचना केल्या आहेत.  

Related Stories

१८ वर्षांवरील सर्वांना लस; आज ४ वाजल्यापासून नोंदणी सुरू

triratna

चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या; नाराजीच्या अफवांना पंकजा मुंडेंकडून पुर्णविराम

triratna

महाराष्ट्रात दिवसभरात 3 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

पोलखोल सभा घेऊन पवारांना उघडे पाडणार

triratna

महागाईप्रश्नी राष्ट्रवादी होणार आक्रमक

datta jadhav

जिह्यात कोरोनामुक्ती 6 हजार पार :

Patil_p
error: Content is protected !!