तरुण भारत

साताऱयातील पहिली महिला ‘बॉम्ब टेक्निशन’ मोना निकम

प्रतिनिधी/ सातारा

बॉम्ब, बॉम्ब हा शब्द जरी ऐकला तर पोलीसांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. प्रत्येक जण आपला जीवमुठीत घेवून बॉम्ब स्कॉड ची वाट पाहत असतो. अशा या बॉम्ब स्कॉड टीम मध्ये अनेक वर्षापासून पोलीस दलातील पुरूष कर्मचारी काम करतात. परंतु पहिल्यांदाच सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक मोना निकम यांचा सहभाग या टीम मध्ये झाला आहे. बॉम्ब स्कॉड मध्ये ‘बॉम्ब टेक्निशन’ म्हणून काम करणाऱया पश्चिम महाराष्ट्रातील त्या पहिल्या महिला पोलीस आहेत.

Advertisements

    घरची परिस्थिती बेताची असल्याने नोकरी करणे हा एकच पर्याय पोलीस नाईक मोना निकम यांच्या समोर होता. तीन बहिणीं, आजारी वडील यांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. या जबाबदारी सोबत जीवनाच्या खऱया संघर्षाला त्यांनी सुरूवात केली होती. सन 2007 मध्ये पोलीस दलात मोना निकम या भरती झाल्या. पहिल्याच भरतीमध्ये नोकरी मिळाल्याने त्यांनी ही संधी समजून या संधीचे सोने करण्याचे ठरवले. गेली 14 वर्ष त्या पोलीस दलात कार्यरत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसवण्यासाठी त्या नेहमी दोन पावले पुढे ठेवून काम करतात. म्हणून सातारा जिल्हा पोलीस दलातील लेडी सिंघम अशी त्यांची ओळख आहे. या लेंडी सिंघमने आणखी एका संधीचे सोने केले आहे. बॉम्ब स्कॉड टीम मध्ये त्यांनी बॉम्ब टेक्निशनचे टेनिंग पूर्ण केले आहे. बॉम्ब कसा हाताळायचा, तो कसा बनावला जातो, वजनदार ड्रेस कसा घालून काम करायचे यांचे ट्रेनिंग त्यांनी घेतले आहे. पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्त्वाखाली हे बॉम्ब स्कॉड काम करत असते. पाच ते सहा जणांनी टीम यामध्ये काम करते. या बॉम्ब स्कॉड मध्ये फक्त पुरूष कर्मचारी काम करत हेते. महिलांचा या स्कॉड मध्ये सहभाग नव्हता. आता पोलीस नाईक मोना निकम यांचा सहभाग या स्कॉड मध्ये झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील त्या पहिल्या महिला बॉम्ब टेक्निशन बनल्या आहेत. ही फक्त सातारा जिल्हा पोलीस दलासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. 

Related Stories

महावितरणकडून व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक कार्यान्वित

Abhijeet Shinde

नोकरीतील पदोन्नतीसाठी राज्यभरात कास्ट्राईबतर्फे धरणे आंदोलन

Abhijeet Shinde

दमदार पावसाने जिल्हय़ाला पुन्हा झोडपले

Patil_p

सातारा : डबेवाडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ

datta jadhav

सातारा : शाहूपुरी ग्रामपंचायतीसह इतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावणार : उपनगराध्यक्ष मनोज शेंडे

Abhijeet Shinde

साताऱ्यात आता ‘अॅन्टीबॉडीज घोटाळा’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!