तरुण भारत

मिरवणुकीविना दिला जाणार बाप्पाला निरोप

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरात पालिकेकडे नोंदणी केवळ 82 गणेश मंडळांनी केलेली असली तरीही प्रत्येक पेठेत, प्रत्येक वॉर्डात गणपती मंडळे आहेत. त्यांच्याकडून गणेशाची प्रतिष्ठापना साध्या पद्धतीने यावर्षी केलेली आहे. दि. 18 रोजी सायंकाळी शहरातील काही मंडळांनी विसर्जन केले तर दि. 19 रोजी मुख्य विसर्जनाचा दिवस असल्याने सातारा पालिकेच्यावतीने शहरात विसर्जनाची तयारी केली आहे. मोठय़ा गणपतींकरता बुधवार नाक्यावर प्रतापसिंह शेती शाळेच्या जागेत 50 मीटर बाय 25 मीटर लांबी रुंदीचे व 12 मीटर खोलीचे तळे तयार असून त्या तळय़ात विसर्जनाकरता 100 टनाची क्रेन तयार ठेवण्यात आलेली आहे.

Advertisements

यावर्षी कोरोनाबरोबर अतिवृष्टीचे संकट आल्याने गणेशोत्सव एवढय़ा दिमाखात व डामडौलात साजरा न करता सातारा शहरातील मंडळांनी अतिशय साध्या पद्धतीने गेली आठ दिवस गणपतींची सेवा केली. मुख्य विसर्जनाचा उद्या दिवस असल्याने शहरातील सातारा शहर आणि शाहुपूरी पोलीस ठाणे या दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गणपर्तीं मंडळांना अगोदरच पोलीस व पालिका यांनी सुचना दिलेल्या आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने मिरवणुका काढू नयेत, गर्दी करु नये, नियम पाळावेत, असे पोलिसांनी आवाहन केलेले असले तरीही गणेशभक्तांकडून विसर्जन हे होणारच हे गृहीत धरुन सातारा पालिकेच्यावतीने बुधवार नाका विसर्जन तळे, हुतात्मा तळे, मंगळवार तळे येथे हौद, फुटका तलाव येथे हौद, पालिका पोहण्याचा तलाव, दगडी शाळा आणि अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्यासमोर आदी ठिकाणी पालिकेच्यावतीने सोय करण्यात आली आहे.

पालिकेच्यावतीने मुख्य विसर्जन तळे हे प्रतापसिंह शेती शाळेतील विहिरीने आणि कावरे यांच्या विहिरीतून 90 दशलक्ष लीटर पाणी भरुन घेतली आहे. 12 मीटर खोलीचे हे तळे असून तळयामध्ये मोठय़ा उंचीचे गणपती विसर्जन करण्यासाठी खास स्विंग क्रेन बोलवण्यात ओली आहे. त्या क्रेनवर गणेश मूर्ती घेवून ती तळय़ात अलगद सोडविण्यात येणार आहे. दोन स्टेज करण्यात आलेली आहेत. त्या स्टेजवर केवळ 20 लोकांची क्षमता आहे. संपूर्ण तळय़ाला बॅरिकेंटीग करण्यात आलेले ओह. तळयावर पालिकेचा अभियंता, लिपिक, शिपायी असे 15 कर्मचारी दोन शिपमध्ये कार्यरत आहेत. तसेच सुरक्षा रक्षक व पोलीस ही तैनात आहेत.

45 हॅलोजन लाईट

रात्री उशीरापर्यंत विसर्जन चालणार असल्याने पालिकेच्यावतीने सगळय़ा तळयांवर 45 हॅलोजन लाईट लावण्यात आलेल्या आहेत. या हॅलोजन लाईटबरोबरच जनरेटरची सोय प्रत्येक ठिकाणी करण्यात आलेली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरे बुधवार नाक्यावर चार, दडगी शाळेवर तीन, हुतात्मा स्मारकला दोन असे सीसीटीव्ही कॅमेऱयाचा वॉच असणार आहे.

पालिकेच्या गणेश मंडळाचा साधेपणाने होणार विसर्जन

दरवर्षी सातारा शहरात पालिकेच्या गणेशोत्सव मंडळांची पहिली मिरवणूक निघते. त्यापाठोपाठ इतर मंडळांच्या मिरवणुका निघतात. यावर्षी मिरवणुकाच नाहीत. त्यामुळे सातारा पालिका गणेशोत्सव मंडळाचा श्रींचे विसर्जन हे सकाळी 11 वाजता साधेपणाने होणार असल्याचे समजते.

मिरवणुकांना बंदी

सातारा शहर पोलीस ठाण्याच्यावतीने मुख्य विसर्जनाच्या अनुषंगाने गणेश मंडळांना विनंती करण्यात येते की, यावर्षी कोरोनाच्या संकटाला सामोरे जावून विसर्जन करायचे आहे. नागरिकांनी घरगुती गणपतींचे विसर्जन घरीच करावे. कमीत कमी लोकांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कमी संख्येने विसर्जनाकरता घेवून जावे. विसर्जन ठिकाणी गर्दी करु नये, प्रसाद वाटू नये, आरती घरीच करावी, विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही. संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी. जर मिरवणूक काढली, जास्त लोक आले तर पोलीस कारवाई केली जाईल, असे आवाहन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले आहे.

Related Stories

अपहरण झालेल्या युवकाची सहा तासात सुटका

Patil_p

देशात 1.76 लाख उपचारार्थ रुग्ण

datta jadhav

सेवानिवृत्त जवानांची कराडमध्ये जंगी मिरवणूक

Patil_p

महिलेच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

datta jadhav

ज्येष्ठ नागरिक करणार आंदोलन

datta jadhav

सातारा : गणेशवाडी येथे वृद्धास मारहाण

triratna
error: Content is protected !!