तरुण भारत

कोरोना चाचण्यांची संख्या उद्यापासून वाढणार

प्रतिनिधी/ रत्नागिरी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिह्यात आलेल्या चाकरमान्यांचा विचार करता 20 सप्टेंबरपासून कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी ड़ॉ अनिरूद्ध आठल्ये यांनी दिली आह़े

Advertisements

   जिह्यामध्ये आलेले 70 टक्के चाकरमानी लसीकरण झालेले अथवा चाचणी करून जिह्यात दाखल झाले होत़े त्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली नाह़ी मात्र ज्या लोकांमध्ये लक्षणे दिसून येत होती त्यांची चाचणी करण्यात आल़ी आतापर्यंत 30 टक्के चाकरमान्यांची तपासणी झाली आह़े अनंत चतुर्दशीनंतर पुन्हा एकदा जिह्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे, असे ड़ॉ आठल्ये यांनी सांगितल़े  

जिह्यात उपचारातील रूग्णांमध्ये घट झाली आह़े शनिवार सायंकाळपर्यंत 873 रूग्ण उपचाराखाली असून त्यातील 346 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़ जिह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.59 पर्यंत पोहोचले आह़े शनिवारी 71 नव्या रूग्णांची नोंद झाली असून 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा

   जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी एकूण 4 हजार 171 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआरच्या 1 हजार 999 चाचण्यांपैकी 32 तर ऍन्टीजेनच्या 2 हजार 172 पैकी 39 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आल़े यामध्ये मंडणगड व दापोली प्रत्येकी 5, खेड 4, गुहागर 3, चिपळूण 18, संगमेश्वर व राजापूर प्रत्येकी 6, रत्नागिरी 22 तर लांजा तालुक्यातील 2 रूग्ण आहेत़ यामुळे जिह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या  77 हजार 317 झाली आह़े  आरटीपीसीआर चाचणीनुसार जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 1.60 झाला आह़े

     शनिवारी 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े यामध्ये चिपळूण व संगमेश्वर प्रत्येकी  1 तर राजापूर तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. शनिवारी बरे झालेल्या 259 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या 73 हजार 907 व प्रमाण 95.59 झाले आह़े

Related Stories

रत्नागिरी : तेरा दिवसांनंतरही दसपटी संपर्काबाहेर…

triratna

कसईनाथ डोंगरावर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी

NIKHIL_N

रत्नागिरी : लांजा महामार्ग कामाला अखेर मुहूर्त!

triratna

कोसुंब-रेवाळेवाडीतील तरुण तडीपार

Patil_p

महाराष्ट्र, आंध्र, ओडिशासाठी यूएनडीपीचा नवा प्रकल्प

NIKHIL_N

नेमळे कौल उत्पादक संस्थेला आधुनिकतेने उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न- राऊळ

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!