तरुण भारत

सकाळी 10 पासूनच श्री विसर्जनाला सुरुवात करा

गणेशोत्सव मंडळांना पोलीस अधिकाऱयांचे आवाहन

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

श्री विसर्जनासाठी बेळगाव सज्ज झाले आहे. पोलीस दलाने यासाठी व्यापक तयारी केली आहे. संवेदनशील भागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी 10 पासूनच विसर्जनाला सुरुवात करावी, असे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी यासंबंधी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. श्री विसर्जनाची यंदा मिरवणूक असणार नाही. प्रत्येक श्रीमूर्ती समवेत केवळ 10 प्रमुख कार्यकर्त्यांना मुभा असणार आहे. डॉल्बी, बँजो व इतर वाद्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

बंदोबस्तासाठी 1200 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. 60 पोलीस उपनिरीक्षक, 40 पोलीस निरीक्षक, 8 एसीपी, राज्य राखीव दलाच्या 8 व शहर सशस्त्र दलाच्या 10 तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. खासकरून संवेदनशील भागात बंदोबस्त वाढविण्यात आल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.

पोलीस अधिकाऱयांनी अनेक मंडळांना भेटी देऊन रविवारी सकाळी 10 पासूनच श्री विसर्जनाला सुरुवात करावी. सायंकाळी 5 च्या आत शेवटच्या श्रीमूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 9 पासून कर्फ्यू असणार आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत कार्यकर्त्यांना श्री विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासंबंधी पोलीस अधिकाऱयांनी कार्यकर्त्यांमध्ये जागृती सुरू केली असून शनिवारी सायंकाळनंतर ध्वनीक्षेपकावरून नागरिकांना आवाहन करण्यात येत होते. लवकरात लवकर श्री विसर्जनाला सुरुवात करावी. शनिवारीच लिलाव पूर्ण करण्याचे आवाहन पोलीस करत होते.

Related Stories

मलप्रभा नदीघाट नामांतराच्या निमित्ताने विकासकामे मार्गी लागणार

Amit Kulkarni

मराठीत परिपत्रके-फलकांसाठी मध्यवर्ती म. ए. समितीचे निवेदन

Amit Kulkarni

सदलगा येथे दहा एकरातील ऊस जळून खाक

Omkar B

मुचंडी मळा येथे गटारीला दोन्ही बाजूने स्लोप

Amit Kulkarni

अलतगा येथे बँक ऑफ इंडियातर्फे जागृती मेळावा

Amit Kulkarni

काळय़ा यादीतील गुन्हेगारांना तंबी

Amit Kulkarni
error: Content is protected !!