तरुण भारत

आलखनूर येथील बालक पडले कूपनलिकेत

वार्ताहर/ कुडची

रायबाग तालुक्मयातील आलखनूर गावातून काल शुक्रवारी (दि. 17) बालक बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मात्र, बेपत्ता बालक कूपनलिकेत पडल्याचे स्पष्ट झाले आहे. शरत सिद्धाप्पा हसिर (वय 2) असे बालकाचे नाव आहे.

Advertisements

आलखनूर गावातून बेपत्ता झालेले दोन वर्षाचे बालक कूपनलिकेत पडल्याचे आज सायंकाळी दिसून आले. ही माहिती समजताच हारुगेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बालकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते.

आलखनूर गावातील 2 वर्षाचे बालक शरत हे शुक्रवारी बेपत्ता झाले होते. शेतातील घरानजिक असलेल्या कूपनलिकेजवळ तो खेळत होता. खेळता खेळता तो अचानक बेपत्ता झाला होता. त्यामुळे या प्रकरणी हारुगेरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या कूपनलिकेत सदर बालक पडल्याचे आज सायंकाळी समजताच बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे.

Related Stories

पोलिसांवर हल्ला करणाऱया दोघा जणांना अटक

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात मंगळवारी 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Rohan_P

रेल्वेत चोरी करणाऱया तरुणाला अटक

Patil_p

गौरव देसाई राऊंड टेबल चेअरमनपदी

Amit Kulkarni

गणेशपूर स्मशानभूमिची आमदार पुत्राकडून साफसफाई

Amit Kulkarni

शास्त्री नगर परिसरात डेनेजमुळे विहिरी दूषित

Amit Kulkarni
error: Content is protected !!