तरुण भारत

आज गणरायाला देण्यात येणार निरोप

विसर्जन तलावांवर तयारी

बेळगाव  / प्रतिनिधी

Advertisements

विघ्नहर्ता गणरायाचे दहा दिवस मनोभावे पूजन केल्यानंतर रविवारी अनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यात येणार आहे. घरगुती गणेशमूर्तींसह सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील विसर्जन तलावांवर मोठय़ा मूर्तींच्या विसर्जनासाठी पेनची तसेच इतर व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई-पुणेनंतर सर्वांत मोठा गणेशोत्सव हा बेळगावमध्ये साजरा करण्यात येतो.  सजीव देखावे हे बेळगावच्या गणेशोत्सवाचे वैशिष्टय़ आहे. मोठय़ा उत्साहात व जल्लोषात गणेशोत्सव साजरा होतो. 15 ते 20 तास विसर्जन मिरवणूक चालते. पारंपरिक ढोल-ताशांचा होणारा गजर पाहण्यासाठी दूरवरून नागरिक येत असतात. परंतु कोरोनामुळे गणेशोत्सवाचे स्वरूपच बदलले. मागील वर्षीपासून विसर्जन मिरवणुका बंद करण्यात आल्याने मंडळे दिवसाच गणेशमूर्तींचे विसर्जन करीत आहेत.

विसर्जन तलाव सज्ज

बेळगाव शहर व उपनगरांमधील विसर्जन तलावांवर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. कपिलेश्वर तलाव, जक्कीनहोंड, अनगोळ विसर्जन तलाव, मजगाव, ब्रम्हनगर तलाव, जुने बेळगाव तलाव, किल्ला तलाव, कणबर्गी तलाव येथे मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक विसर्जन तलावावर लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त शनिवारी रात्रीपासूनच ठेवण्यात आला आहे.

नवव्या दिवशी गणरायाला देण्यात आला निरोप

परंपरेनुसार काही भाविकांनी शनिवारी नवव्या दिवशी लाडक्मया गणरायाला निरोप दिला. कपिलेश्वर विसर्जन तलावात विसर्जनासाठी शनिवारी भाविक दाखल होत होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वषी लवकर या’ च्या जयघोषात विसर्जन करण्यात आले. रविवारी होणारी गर्दी लक्षात घेऊन काही भाविकांनी शनिवारीच गणरायाचे विसर्जन केले.

मनपाकडून फिरत्या वाहनांची सोय

विसर्जन तलावांवर गर्दी होऊ नये यासाठी बेळगाव महानगरपालिकेच्यावतीने फिरत्या विसर्जन वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक विभागामध्ये या वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी त्या ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जक्कीनहोंड येथील पाण्याला दुर्गंधी

महानगरपालिकेच्यावतीने मराठा मंदिरजवळील जक्कीनहोंड येथे विसर्जन तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सवापूर्वी कुंडातील पाणी काढून स्वच्छता करून त्यामध्ये नव्याने पाणी भरण्यात आले होते. परंतु त्यामध्ये आजूबाजूचे सांडपाणी झिरपत असल्याने पाण्याला दुर्गंधी येत आहे. तसेच पाणी देखील काळे पडले आहे. या पाण्यात विसर्जन कसे करायचे? असा सवाल भाविक विचारत आहेत.

Related Stories

भडकल गल्ली येथे दूषित पाणीपुरवठा

Amit Kulkarni

डायसच्या चित्राला राष्ट्रीय स्पर्धेत दुसरा क्रमांक

Amit Kulkarni

चार्टर्ड अकौंटंट्स बेळगाव शाखेला बहुमान

Amit Kulkarni

इंधन दरवाढीचा बससेवेवर परिणाम

Omkar B

बापटगल्ली कालिकादेवी युवक मंडळाच्या पदाधिकाऱयांची निवड

Amit Kulkarni

सामाजिक बांधिलकी जपणारी वन टच फाउंडेशन संस्था

Patil_p
error: Content is protected !!