तरुण भारत

पुणे-एर्नाकुलम साप्ताहिक रेल्वे होणार पूर्ववत

पश्चिम महाराष्ट्राशी कोकण किनारपट्टी जोडली जाणार

बेळगाव  / प्रतिनिधी

Advertisements

पश्चिम महाराष्ट्राला कोकण किनारपट्टीशी जोडणारी पुणे-एर्नाकुलम साप्ताहिक रेल्वे (क्र. 01197, 01198) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे बेळगावमधून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, मिरज तर कोकण किनारपट्टीवरील कारवार, कुमठा, भटकळ, उडुपी व मंगळूर येथे प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे. 25 सप्टेंबरपासून ही रेल्वे पूर्ववत होणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

पुणे येथून रात्री 10.10 वा. निघालेली रेल्वे सकाळी 6.55 वा. बेळगावला पोहोचणार आहे. तिसऱया दिवशी दुपारी 3.20 वा. एर्नाकुलमला पोहोचणार आहे. प्रत्येक सोमवारी सायंकाळी 6.50 वा. एर्नाकुलम येथून निघालेली रेल्वे दुपारी 2 वा. 8 मि. बेळगावमध्ये तर रात्री 11 वा. 25 वा. पुण्याला पोहोचणार आहे.

या स्थानकांवर थांबणार रेल्वे

सातारा, कराड, सांगली, मिरज, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, कॅसलरॉक, कुलेम, सावेंद्रम, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, होन्नावर, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड, कुंदापूर, उडुपी, मंगळूर जंक्शन, कासरगोड यासह इतर स्थानकांवर रेल्वे थांबणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.    

Related Stories

देसूर जवळ अपघातात चिकोडीचा तरुण ठार

Patil_p

स्मार्ट सिटीचे वरातीमागून घोडे

Amit Kulkarni

पाणीपट्टी न भरल्यास नळ जोडणी बंद करण्याचा इशारा

Patil_p

मराठी भाषिकांत ऐक्य राखणे हीच हुतात्म्यांना आदरांजली

Amit Kulkarni

बेळगाव रेल्वेस्थानकावर तिसऱया डोळय़ाची राहणार नजर

Patil_p

प्रा.डॉ.शोभा नाईक यांना कबीर पुरस्कार जाहीर

Patil_p
error: Content is protected !!